अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:54 PM2018-10-02T16:54:09+5:302018-10-02T16:58:07+5:30

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती.

Akshay Kumar and Rajinikanth's '2.0' movie new video out | अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या '2.0' सिनेमाचा नवा व्हिडिओ आला समोर

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयचा व्हिलेनवाला अंदाज बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेव्हिएफएक्स इफेक्टवर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा बहु-प्रतीक्षित सिनेमा '2.0' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा धमाकेदार टीझर समोर आला होता. सिनेमातील जबरदस्त स्टोरीशिवाय वीएफएफक्सची देखील चर्चा झाली होती. अक्षयचा व्हिलेनवाला अंदाज बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसतेय सिनेमाच्या तिच्याविरुद्ध होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ट्रेलरमध्ये रजनीकांत कमी आणि अक्षय कुमार जास्त दिसणार आहे.

   

या सिनेमासाठी जवळपास 1000 वीएफएक्स आर्टिस्टची मदत घेण्यात आली आहे. तसेच 10 कॉन्सेप्ट आर्टिस्ट, 25 डिझायनर्सनी काम केले आहे. 
मेकिंग व्हिडिओला शेअर करताना करण जोहरने एक कॅप्शन सुद्धा दिले आहे, हा पाहा '2.0' सिनेमाचा बीटीएस व्हिडिओ. आम्हाला सिनेमाचा भाग बनून अभिमान वाटतोय. 

यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती खुद्द अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाऊंटवर दिली आहे. सिनेमाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली, अशी माहिती अक्षयने चाहत्यांशी शेअर केली आहे. निश्चितपणे भारतीय सिनेमांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही सिनेमाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा सिनेमा म्हणणे गैर होणार नाही. हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हेही भारतात पहिल्यांदाच झाले आहे.  याचवर्षी २९ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. यानंतर १३ अन्य भाषांत तो डब केला जाईल.

Web Title: Akshay Kumar and Rajinikanth's '2.0' movie new video out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.