Bollywood Flop Movie : 350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:39 IST2024-12-30T16:39:45+5:302024-12-30T16:39:59+5:30
दोन सुपरस्टार असलेला चित्रपट नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही.

Bollywood Flop Movie : 350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप!
Bollywood Flop Movie : 2024 चा निरोप घ्यायची वेळ आलीये. 2 दिवसात नवीन वर्ष सुरू होतंय. 2025 च्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झालेत. यावर्षी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, त्यातील फार कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले. त्यातील बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले. या चित्रपटांचं तर बजेटही रिकव्हर झालेलं नाही. काहींना तर खूप मोठा तोटा झालाय. असाच एक चित्रपट आहे, ज्यात दोन सुपरस्टार होते, पण हा चित्रपट 2024 मधील सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
चित्रपटाचे बजेट किती होते आणि त्यानं किती कमाई केली याच्या आधारावर चित्रपट हिट की फ्लॉप हे ठरवले जातात. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बड़े मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट या वर्षीचा सगळ्यात मोठा फ्लॉप चित्रपट ठरलाय. 'एबीपी'ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचं बजेट 350 कोटी होतं. मात्र, या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर केवळ 66 कोटी रुपये कमावले आणि जगभरात 102 कोटींची कमाई केली.
'बड़े मियाँ छोटे मियाँ' हा ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स आणि अक्षय कुमार-टायगर श्रॉफचे स्टारडम असूनही हा चित्रपट लोकांना भावला नाही. त्यामुळे चित्रपटाला 250 कोटींचा तोटा झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं होतं. तर वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते होते. सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.