‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्काय फोर्स' होणार प्रदर्शित, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:54 IST2025-02-02T16:53:05+5:302025-02-02T16:54:24+5:30
'स्काय फोर्स' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार हे जाणून घेऊया.

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्काय फोर्स' होणार प्रदर्शित, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा सिनेमा
Sky Force OTT Release: अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांची मुख्य भूमिका असलेला 'स्काय फोर्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या देशभक्तीपर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 'स्काय फोर्स' सिनेमामुळे अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची मालिका संपणार अशी शक्यता दिसतेय. अशातच आता सिनेमाच्या OTT रिलीजबाबत अपडेट समोर आलं आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार हे जाणून घेऊया.
'स्काय फोर्स'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. अक्षयचा हा चित्रपट कधी आणि कुठे ऑनलाइन स्ट्रीम केला जाऊ शकतो हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या डिजिटल हक्कांबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्काय फोर्स' प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २४ जानेवारी रोजी 'स्काय फोर्स' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट तब्बल १६० कोटी रुपये आहे. तर हा चित्रपट १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे.
'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमार व वीर पहारिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सारा अली खान, निम्रत कौर, बोगुमिला बुबैकदेखील या चित्रपटात आहे. वीर पहारियाने 'स्काय फोर्स' मधून बॉलिवूड पदार्पण केलं आहे. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. कन्या स्मृती पहारिया व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे.