फॅनगिरी करणं पडलं महागात; चाहत्याच्या 'या' कृतीमुळे संतापलेल्या अक्षयने उचलला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 14:02 IST2022-05-08T14:01:08+5:302022-05-08T14:02:03+5:30
Akshay kumar: फोटो काढण्याच्या नादात एका चाहत्याने अभिनेत्याता अपमान केला त्यामुळे संतापलेल्या अक्षयने त्याच्यावर हात उगारला.

फॅनगिरी करणं पडलं महागात; चाहत्याच्या 'या' कृतीमुळे संतापलेल्या अक्षयने उचलला हात
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.यात सलमान (salman khan), शाहरुख (shahrukh khan), अक्षयकुमार (akshay kumar) आणि बिग बी (big B)अशा कलाकारांची आवर्जुन नावं घेतली जातात. त्यामुळे या कलाकारांना भेटण्यासाठी, त्यांची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी चाहते धडपड करत असतात. परंतु, त्यांच्या या धडपडीमध्ये अनेकदा कलाकारांनाही दुखापत होते वा त्यांना या गर्दीचा त्रासही होतो. त्यामुळे अनेकदा हे सेलिब्रिटी भर कार्यक्रमात वा मीडियासमोर चाहत्यांवर चिडतात. असाच काहीसा प्रकार अभिनेता अक्षय कुमारसोबत घडला आहे. फोटो काढण्याच्या नादात एका चाहत्याने चक्क अभिनेत्याचं डोकं पकडलं जे पाहून संतापलेल्या अक्षयने त्याच्यावर हात उगारला.
सध्या सोशल मीडियावर अक्षयचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी अक्षयभोवती प्रचंड मोठी गर्दी केली असून त्याला पार गर्दीने घेरलं आहे. या गर्दीतील प्रत्येक व्यक्तीला त्याच्यासोबत फोटो काढायचा होता. परंतु, एका चाहत्याने तर हद्दचं केली. चक्क अक्षयचं डोकं जोरात खेचलं. ज्यामुळे अक्षय संतापला.
अक्षयनेही उचलला हात
अक्षयसोबत सेल्फी घेता यावा यासाठी या चाहत्याने त्याचं डोकं जोरात खेचलं आणि तो फोटो काढू लागला. परंतु, यावेळी अक्षयच्या मानेला हिसका बसल्यामुळे त्याने रागातच या चाहत्याचा हात झटकला आणि त्याला असं करण्यास मनाई केली. यावेळी अक्षयने त्याच्याकडे रागाने पाहात हाताने असं करु नको असा इशारा केला. सोबतच मारण्याची अॅक्शनही केली.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक जण या चाहत्याची खिल्ली उडवत आहेत. तर काही जण अक्षयला ट्रोलही करत आहेत. त्यामुळे सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.