सलग पाच सिनेमे फ्लॉप, निर्मात्यांचे ३०० कोटी रुपये बुडवले; अक्षयने याआधीही पाहिलाय उतरता काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 09:07 AM2023-03-05T09:07:10+5:302023-03-05T09:08:00+5:30

सध्या बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार फ्लॉप ठरत असल्याचं चित्र दिसतंय.

akshay kumar back to back 5 films flop in a row makers 300 crore rupees loss | सलग पाच सिनेमे फ्लॉप, निर्मात्यांचे ३०० कोटी रुपये बुडवले; अक्षयने याआधीही पाहिलाय उतरता काळ

सलग पाच सिनेमे फ्लॉप, निर्मात्यांचे ३०० कोटी रुपये बुडवले; अक्षयने याआधीही पाहिलाय उतरता काळ

googlenewsNext

Akshay Kumar : सध्या बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार फ्लॉप ठरत असल्याचं चित्र दिसतंय. एकानंतर एक अक्षयचे पाच सिनेमा फ्लॉप झालेत. नुकत्याच रिलीज झालेल्या 'सेल्फी' (Selfie) सिनेमाकडून त्याला  अपेक्षा होती मात्र हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसर कमाल दाखवू शकला नाही. तर दुसरीकडे शाहरुखच्या 'पठाण'ने (Pathaan) रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉलिवूडचे बुडते जहाज वर आणले. दरम्यान अक्षयच्या फ्लॉप कामगिरीमुळे त्याने निर्मात्यांचे तब्बल ३०० कोटी रुपये बुडवले आहेत.

गेल्या १९ महिन्यात अक्षयचे एकूण पाच चित्रपट रिलीज झाले. 'बेल बॉटम', 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षाबंधन' आणि 'रामसेतू' हे चित्रपट फ्लॉप झाले. या पाच सिनेमांचे एकूण बजेट ६२० कोटी रुपये होते. तर प्रत्यक्षात या सिनेमांनी केवळ ३२४ कोटी रुपयांची कमाई केली. अक्षयच्या पाच सिनेमांची एकूण कमाई ही 'पठाण'च्या एकट्या कमाईच्या निम्मीही नाही. 2021 मध्ये आलेल्या 'सूर्यवंशम' नंतर अक्षयचा एकही सिनेमा चालला नाही. 

अक्षयने याआआधीही त्याच्या करिअरमध्ये असा उतरता काळ पाहिला आहे. एकेकाळी त्याचे सलग १६ सिनेमे फ्लॉप झाले होते.तर आताही अक्षयचे सलग ६ चित्रपट फ्लॉप झाले आहेत. याची १०० टक्के जबाबदारी माझीच आहे, प्रेक्षकांच्या आवडीनुसार स्वत:ही बदलणं गरजेचं आहे. असं त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. अक्षय सध्या अमेरिका टूरवर आहे. ही 'एंटरटेनर्स टूर' असून त्याच्यासोबत नोरा फतेही, मौनी रॉय, दिशा पटाणी, सोनम बाजवा, अपारशक्ती खुराना हे देखील आहेत. अमेरिकेतील अनेक शहरात ते लाईव्ह परफॉर्म करत आहेत.

अक्षय कुमार आता हेरा फेरी ३ चे शूटिंग करत आहे. अक्षयने हेरा फेरी ३ नाकारला होता. मात्र आता चाहत्यांना सुखाचा धक्का देत राजू पुन्हा परतला आहे. 

Web Title: akshay kumar back to back 5 films flop in a row makers 300 crore rupees loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.