​अक्षय कुमारने तोडली पाच हजार वर्षांची परंपरा; नंदगाववासियांमध्ये असंतोष, शूटिंग थांबविण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 06:58 PM2016-11-19T18:58:11+5:302016-11-19T18:58:11+5:30

अक्षय कुमार व भूमी पेडणेकर अभिनित आगामी ‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे शूटिंग नंदगावमध्ये सुरू आहे. या ...

Akshay Kumar broke five thousand years of tradition; Dissatisfaction in Nandgaon residents, threat to stop shooting | ​अक्षय कुमारने तोडली पाच हजार वर्षांची परंपरा; नंदगाववासियांमध्ये असंतोष, शूटिंग थांबविण्याची धमकी

​अक्षय कुमारने तोडली पाच हजार वर्षांची परंपरा; नंदगाववासियांमध्ये असंतोष, शूटिंग थांबविण्याची धमकी

googlenewsNext
ong>अक्षय कुमार व भूमी पेडणेकर अभिनित आगामी ‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे शूटिंग नंदगावमध्ये सुरू आहे. या चित्रपटामध्ये नंदगावच्या अक्षय कुमारने बरसाना गावातील भूमीशी लग्न केले असल्याचे कथानक आहे. शूूटिंग सुरू असतानाच याला स्थानिकांनी विरोध केला. यामुळे अक्षयसह संपूर्ण टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. नंदगाववासियांच्या मते मागील पाच हजार वर्षांत येथील मुलाचे बरसानाच्या मुलीशी लग्न झालेले नसल्याने या वादाला तोंड फुटले आहे.
 
नंदगाव मंदिरातील पुजाºयांनी यासाठी पुढाकार घेतला असून, चित्रपटाद्वारे पाच हजार वर्षांपासून सुरू असलेली परंपरा तोेडली जात असल्याचा आक्षेप नोंदविला आहे. या प्रकरणाला गावकरी न्यायालयात घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. येथे सांगण्यात येणाºया कथेनुसार भगवान कृष्ण नंदगावचे तर राधा ही बरसाना येथे राहणारी होती. नंदगावच्या ‘श्रीजी’ मंदिराचे पुजारी भगवान दास गोस्वामी म्हणाले, नंदगावातील प्रत्येक मुलगा कृष्णाचा सखा तर बरसानाची प्रत्येक मुलगी राधा मानली जाते. यामुळे चित्रपटातही दोन गावातील मुला-मुलींमध्ये लग्न करविणे चुकीचे आहे. 

बरसाना येथील ब्रम्हाचार्य पिठाचे प्रवक्ता गोस्वामी घनश्याम राज भट्ट म्हणाले, ‘पाच हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार नंदगाव आणि बरसानामध्ये विवाह संबंध झाले नाहीत. बरसानाचे लोक नंदगावला राधाचे सासर मानतात. ते नंदगावचे पाणीही पित नाहीत.’ दोन्ही गावातील पुजाºयांनी निर्मात्याना चित्रपटातील कथा बदलण्यास सांगितले आहे. जर कथा बदलली नाही तर चित्रपटाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी देण्यात आली आहे. 

नंदगावमध्ये अक्षय कुमार शूटिंग करणार असल्याचे ज्यावेळी सांगण्यात आले होते, तेव्हा येथील लोकांनी त्याचे जोरदार स्वागत केले होते. मात्र चित्रपटातील लग्नावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Akshay and Bhoomi in Toilet : Ek Prem Katha

Web Title: Akshay Kumar broke five thousand years of tradition; Dissatisfaction in Nandgaon residents, threat to stop shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.