अक्षय कुमारच्या मेहुण्याला आवडला नाही 'लक्ष्मी' सिनेमा, दाजीच्या पुढील सिनेमात दिसणार....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 09:51 AM2020-12-08T09:51:01+5:302020-12-08T09:55:16+5:30
एका मुलाखती दरम्यान करण म्हणाला की, अक्षयने या सिनेमासाठी मेहनत तर खूप केली होती, पण प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला नाही. मनोरंजन विश्वाचं सत्य हेच आहे.
अभिनेता अक्षय कुमारने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'लक्ष्मी' ला सर्वात मोठी ओपनिंग मिळाल्याचा आनंद भलेही साजरा केला असेल, पण खरं हे आहे की, अक्षयचा हा सिनेमा त्याचा मेहुणा करण कपाडियाला अजिबात पसंत पडला नाही. एका मुलाखती दरम्यान करण म्हणाला की, अक्षयने या सिनेमासाठी मेहनत तर खूप केली होती, पण प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला नाही. मनोरंजन विश्वाचं सत्य हेच आहे.
अनेक वादांनंतर 'लक्ष्मी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जातंय असा यावर आरोप लावला होता. तसेच या सिनेमाचं टायटलही बदलावं लागलं होतं. कारण टायटलमुळे हिंदू लोकांच्या भावना दखावल्याचं सांगण्यात आलं होतं.
'लक्ष्मी' सिनेमाला ओपनिंग चांगलं मिळालं आणि अक्षयने याचा आनंदही साजरा केला. पण सत्य हे आहे की, ओपनिंगनंतर ओटीटीवर हा सिनेमा बघायला कमी लोक आलेत. आता स्वत: अक्षय कुमारचा मेहुणा करण कपाडिया म्हणाला की, 'लक्ष्मी'मध्ये अक्षय कुमारकडून चूक झाली. आणि तो या चुकीतून नक्कीच काहीना काही शिकला असेल.
करण म्हणाला की, 'अक्षयने या सिनेमासाठी खूप मेहनत केली होती. पण प्रेक्षकांना हा सिनेमा तेवढा आवडला नाही. हेच मनोरंजनाच्या विश्वाचं सत्य आहे. तुम्हाला प्रत्येकवेळी यश मिळतं असं नाही. काहीना काही चुका होतच असतात. मला विश्वास आहे की, अक्षय या चुकीतून काहीना काही शिकला असेल. तो फार हुशार कलाकार आहे आणि येणाऱ्या काळात जोरदार वापसी करेल'.
करण हा अक्षय कुमारची सासू अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल कपाडियाचा मुलगा आहे. तो ओटीटीवर रिलीज होत असलेल्या भूमि पेडनेकरच्या 'दुर्गामती' मध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जी अशोकने केलं आहे तर निर्माता भूषण कुमार आहे. अक्षय कुमारही याचा सह-निर्माता आहे. भूमिसोबतच या सिनेमात अर्शद वारसी, माही गिल आणि जिशु सेनगुप्ता मुख्य भूमिकेत दिसतील.