Cuttputlli : एक तो रिमेक, ऊपरसे चोरी...! सोशल मीडियावर अक्षय कुमारची ‘गजब बेइज्जती’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 06:20 PM2022-09-05T18:20:56+5:302022-09-05T18:22:15+5:30

Akshay Kumar Cuttputlli : साऊथचा रिमेक असलेल्या ‘कठपुतली’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शिवाय आता या चित्रपटावर डायलॉग चोरीचा आरोप होतो आहे.

Akshay Kumar Cuttputlli Copied Bhuvan Bam Jokes | Cuttputlli : एक तो रिमेक, ऊपरसे चोरी...! सोशल मीडियावर अक्षय कुमारची ‘गजब बेइज्जती’!!

Cuttputlli : एक तो रिमेक, ऊपरसे चोरी...! सोशल मीडियावर अक्षय कुमारची ‘गजब बेइज्जती’!!

googlenewsNext

 Akshay Kumar Cuttputlli : अक्षय कुमारचे (Akshay Kumar) ग्रह सध्या उलटे फिरताना दिसत आहेत. म्हणायला अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी स्टार. वर्षाला सर्वात जास्त सिनेमे बनवण्याचा रेकॉर्ड त्याचाच. पण गेल्या काही महिन्यात अक्षयचे तीन सिनेमे आलेत आणि आले तसे दणकून आपटले. खुद्द अक्षयनेही याचा धसका घेतला आहे. इतका की, आपला नवा सिनेमा ‘कठपुतली’ (Cuttputlli) त्याने चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर रिलीज केला.

गेल्या 2 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज झाला. पण इथेही त्याच्या वाट्याला निराशाच आली. साऊथचा रिमेक असलेल्या ‘कठपुतली’ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शिवाय आता या चित्रपटावर डायलॉग चोरीचा आरोप होतो आहे. उत्तराखंडला हिमाचल प्रदेश सांगून प्रेक्षकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावाही केला जातोय. अक्षय कुमार स्वत: उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बिसीडर असताना त्याच्या सिनेमात अशी चूक व्हावी, हे चाहत्यांना कसं खपणार? त्यामुळेच अक्षय सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय.

सोशल मीडियावर एका युजरने ‘कठपुतली’ची एक क्लिप शेअर केली आहे. यात अक्षय कुमार एक डायलॉग म्हणताना दिसतो. ‘पहले रब होते है, फिर होते हैं मां बाप, फिर आते है भाई-बहन, फिर रिश्तेदार, फिर दोस्त, फिर पडोसी और उसके बाद आते हैं टीचर्स,’ असं अक्षय म्हणतो. यावर क्या आपके घर में कुत्ते नहीं हैं? आप उनका नाम भी अपनी लिस्ट में रख लेते, असं त्याची हिरोईन रकुलप्रीत म्हणते. आता अक्षयच्या या डायलॉगमध्ये काय चुकीचं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर गडबड काहीही नाही, फक्त मामला चोरीचा आहे. होय, हा लोकप्रिय कॉमेडीयन भुवन बामच्या (‌Bhuvan Bam) एका स्केचमधला चोरीचा डायलॉग असल्याचा दावा युजर्स करत आहेत. यावरून अक्षय जबरदस्त ट्रोल होत आहे. कहानी तर सोडा, बॉलिवूडकडे ओरिजनल डायलॉग्सही नाहीत, अशा कमेंट्स युजर्स करत आहेत.

उत्तराखंडला म्हटलं हिमाचल प्रदेश
‘कठपुतली’ची कथा हिमाचल प्रदेशच्या कसौलीची असल्याचं दाखवलं गेलं आहे. पण या चित्रपटाचं संपूर्ण शूटींग उत्तराखंडमध्ये झालं आहे. अक्षय कुमार उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बिसीडर आहे. यावरूनही युजर्स नाराज आहेत. ज्या राज्यात शूटींग झालं, त्या राज्याचं नाव घेण्यात गैर काय? असा सवाल युजर्स करत आहेत.
अक्षय कुमारचा चित्रपट ‘कठपुतली’2018 च्या तमिळ चित्रपट ‘रत्सासन’चा रिमेक आहे. या चित्रपटात चंद्रचूर सिंग यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.या चित्रपटात अक्षय एका पोलिसाच्या भूमिकेत आहे जो एका सीरियल किलरच्या शोधात आहे.

Web Title: Akshay Kumar Cuttputlli Copied Bhuvan Bam Jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.