आमिरच्या सिनेमात साइड रोलसाठी दिलं होतं अक्षयने ऑडिशन, मेकर्सनी केलं होतं बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 03:44 PM2018-08-08T15:44:18+5:302018-08-08T16:22:13+5:30
कमाईच्या बाबतील अक्षयने तिनही खानना मागे टाकलं होतं. यावर्षी अक्षयचे ३ सिनेमे येत आहेत. तर 'पॅडमॅन' रिलीज झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी फोर्ब्स मॅगझिनने एक यादी जाहीर केली होती. या यादीत अक्षय कुमारचं नाव सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सामिल करण्यात आलं होतं. कमाईच्या बाबतील अक्षयने तिनही खानना मागे टाकलं होतं. यावर्षी अक्षयचे ३ सिनेमे येत आहेत. तर 'पॅडमॅन' रिलीज झाला आहे.
५० वर्षीय अॅक्शन हिरो अक्षय कुमारनेबॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. एकीकडे खान मंडळी तर दुसरीकडे अक्षय कुमार असं चित्र आहे. पण एक वेळ अशी होती की, त्याला साईट रोलसाठीही रिजेक्ट करण्यात आलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय त्यावेळी आमिरची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमासाठी ऑडिशन देण्यासाठी गेला होता.
आमिर खानचा 'जो जीता वही सिकंदर' हा सिनेमा १९९२ मध्ये आला होता. या सिनेमासाठी अक्षय कुमारने साइड रोलसाठी ऑडिशन दिलं होतं. पण फिल्ममेकर्सना तो आवडला नव्हता. त्यानंतर हा रोल दीपक तिजोरीला देण्यात आला होता.
अक्षय कुमारने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, 'मी स्क्रीन टेस्ट दिली होती. पण त्यांना मी आवडलो नाही. त्यांनी मला काढून दिलं होतं'. दिग्दर्शक मंसूर खान यांना अक्षय त्या भूमिकेसाठी फिट नव्हता वाटला.
आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय आणि आमिरने एकाही सिनेमात एकत्र काम केलं नाही. पण त्यावेळी अक्षयचं सिलेक्शन झालं असतं तर दोघांना एकत्र बघता आलं असतं. आता अक्षयची लोकप्रियता इतकी आहे की, त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या २ कोटी झाली आहे. याचा आनंद त्याने एका व्हिडीओ शेअर करून व्यक्त केलाय.