Akshay Kumar: अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 03:45 PM2022-10-12T15:45:52+5:302022-10-12T15:47:41+5:30

Akshay Kumar: होय, अक्षयचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे  अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

akshay kumar gets brutally trolled for attending late night party | Akshay Kumar: अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल

Akshay Kumar: अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूड स्टार्सचं झगमगाटी आयुष्य, अलिशान राहणीमान याबद्दल विलक्षण कुतूहल असतं. बॉलिवूड पार्ट्या, पुरस्कार सोहळे, सेलिब्रेशन्स याबद्दल सतत चर्चा होत असते. पार्ट्यामध्ये झालेले वादविवाद, स्टार्सचं वर्तन अशा अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेचे विषय असतात. मात्र बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत जे अशा झगमगाटापासून दूर असतात. त्यापैकीच एक आहे बॉलिवूड स्टार अक्षयकुमार (Akshay Kumar). तो कधीही बॉलिवूड पार्ट्यांना  जात नाही.   करण जोहरच्या शोमध्ये त्याने यामागचं कारणही सांगितलं होतं. ‘मला माझी झोप अतिप्रिय आहे आणि मला सकाळ  बघायला आवडते.  मला नाईट शिफ्ट बिलकूल आवडत नाही.  मी रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठतो. व्यायाम करतो. त्यामुळं रात्री पार्टीला गेलो तर दुसऱ्या दिवशीचं सगळं नियोजन कोलमडतं. म्हणून मी पार्ट्यांना जाणं टाळतोच’, असं अक्की म्हणाला होता. आता अशात अक्षय एका नाईट पार्टीत दिसल्यावर काय होणार? होय, सध्या त्याचीच चर्चा आहे.

होय, अक्षयचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे  अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे.  बर्थ डे पार्टी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो मीडिया फोटोग्राफर्सना पोझदेखील देत आहे. 
काल-परवा अक्षय अश्विन यार्डीच्या बर्थ डे पार्टीत दिसला.  त्याचा एक व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडीओनंतर लोकांनी अक्षयला ट्रोल करायला सुरूवात केली. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून  अक्षयला ‘ढोंगी’ म्हणत त्याच्यावर टीका केली.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही जणांनी अक्षयच्या लूकची आणि त्याच्या फिटनेसची प्रशंसा केली, तर काहींनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.  रात्र झाली, तू अजून झोपला नाहीस? पहाटे ४ वाजता कसे उठणार? अशी उपरोधिक कमेंट एका युजरने केली. अरे हा पार्ट्यांना कधीपासून जायला लागला? असा सवाल एका युजरने केला आहे.  

Web Title: akshay kumar gets brutally trolled for attending late night party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.