Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:44 PM2023-02-24T14:44:13+5:302023-02-24T18:54:37+5:30

आई हा प्रत्येकच्या मनाचा हळवा कोपरा असतो याला बॉलिवूड कलाकारदेखील कसे अपवाद असतील.

Akshay kumar gets emotional remembering late mother aruna bhatia said in his tough time she always used to say do not worry son | Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले

Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले

googlenewsNext

आई हा प्रत्येकच्या मनाचा हळवा कोपरा असतो याला बॉलिवूड कलाकारदेखील कसे अपवाद असतील. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारही आपल्या आईच्या खूप जवळ होता. आईसोबत अक्षयचं खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग शेअर करायचा. अक्षयने नेहमीच म्हणतो आहे की, कठीण काळात त्याची आई त्याच्या पाठीशी ढाल बनून उभी राहिली. अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आईसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. यादरम्यान, त्याची दिवंगत आई अरुणा भाटिया यांच्याबद्दल बोलताना अभिनेत्याला आपले अश्रू अनावर झाले. 

आईच्या आठवणीत अक्षय झाला भावूक 

खिलाडी कुमार सध्या त्याच्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात आहे. कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले की, जर त्याची आई आता तिथे असती तर तिच्या अभिनय कारकिर्दीच्या लो फेजवर  तिची प्रतिक्रिया कशी असती? यावर उत्तर देण्यापूर्वी अक्षय कुमारचे डोळे भरून आले. तो रडायला लागला. 

आजतकच्या सीधी बात या कार्यक्रमात अक्षय आपल्या आईबाबत अनेक गोष्टी सांगताना दिसला. अभिनेता म्हणाला, दरदिवशी शूटिंगवरुन परतल्यानंतर तो थेट आपल्या आईच्या खोलीत जायचा. आईशी बोलल्याशिवाय त्याचा दिवस कधीच पूर्ण होत नसल्याची आठवण अभिनेत्याने सांगितली. यादरम्यान, बोलत असताना अक्षयला रडू कोसळले. अक्षय म्हणाला , "त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे - 'फिक्र नहीं कर पुत्तर, बाबाजी तेरे नाल है'."

हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 8 सप्टेंबर 2021 रोजी अक्षयची आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर अक्षयने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहून दुःख व्यक्त केलं होतं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सेल्फी' शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम ब्लॉकबस्टर 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सेल्फी'चे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. अक्षय कुमार सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या आगामी अॅक्शन थ्रिलरमध्ये तो टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Akshay kumar gets emotional remembering late mother aruna bhatia said in his tough time she always used to say do not worry son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.