Akshay Kumar : आयुषीच्या उपचारासाठी अक्षय कुमारचा पुढाकार, केली १५ लाखांची मदत; होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:05 AM2023-01-10T10:05:15+5:302023-01-10T10:06:22+5:30
अक्षय कुमार नेहमीच सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घेतो. मात्र कधीच त्याचा गाजावाजा करत नाही.
Akshay Kumar : दिल्लीची २५ वर्षीय आयुषी शर्मा (Ayushi Sharma) हिला त्वरित हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहेय यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुढे सरसावला आहे. त्याने आयुषीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे. आयुषीचे आजोबा याोगेंद्र अरुण (Yogendra Arun) यांनी माध्यमांसमोर येत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
योगेंद्र अरुण यांच्या सांगण्यानुसार,'आयुषीला जन्मत:च हृदयविकार होता. २५ व्या वर्षी तिचे केवळ २५ टक्के हदय कार्यरत असल्याचे डॉक्टरांकडून समजले. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. हदय प्रत्यारोपण हा एकच मार्ग शिल्लक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अक्षय कुमारमुळे खूप मदत झाली. आता आयुषीला लवकरात लवकर दाता मिळो हीच प्रार्थना आहे.'
८२ वर्षीय योगेंद्र अरुण यांनी पुढे सांगितले, मी एक निवृत्त मुख्याध्यापक आहे. आयुषीच्या उपचाराचा एकूण खर्च ५० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने गरज असेल तेव्हा अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सम्राट पृथ्वीराज सिनेमाचे दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwiwedi) यांनी अक्षय कुमारला आयुषी बद्दल माहिती दिली. यानंतर अक्षयने त्वरित मदत पोहोचवली. यावर योगेंद्र अरुण यांमी मी जाहीरपणे अक्षयचे आभार मानेल असे सांगितले होते. म्हणूनच आज अक्षयने केलेले हे काम माध्यमांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचू शकले आहे.
अक्षय कुमार नेहमीच सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घेतो. मात्र कधीच त्याचा गाजावाजा करत नाही. सामाजिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अक्षयने बरेच काम केले आहे.