१५ वर्षांपूर्वी थोडक्यात बचावला होता अक्षय कुमार, 'ब्लू'च्या शूटिंगवेळी घडला होता जीवघेणा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:33 AM2024-02-23T11:33:06+5:302024-02-23T11:33:24+5:30
Akshay Kumar : अक्षय कुमारचा २००९ साली ब्लू हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र यातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.
बऱ्याचदा कलाकार शूटिंगदरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येते. मात्र कधी कधी काही प्रसंग जीवावर बेतू शकतात आणि कित्येकदा त्यातून ते बचावतातही. असंच काहीसं घडलं बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar)सोबत. जेव्हा त्याने मृत्यूला खूप जवळून पाहिले होते. आजही तो जीवघेणा घटनेला विसरलेला नाही.
अक्षय कुमारचा २००९ साली ब्लू हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र यातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. अक्षय कुमारने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शूटिंगदरम्यान समुद्रात त्याच्यासोबत जे घडले त्याचे परिणाम खूप वाईट घडू शकले असते.
अभिनेत्याला घेरलं होतं शार्कनं
अक्षय कुमारने सांगितले की, तो ऑक्सिजन टँकशिवाय सीन शूट करत होता. यादरम्यान त्याचे डोके एका डुबलेल्या जहाजाला आपटले. त्यामुळे त्याचे पाण्यात खूप रक्त वाहत होते. स्टंटसाठी ओळखला जाणारा अभिनेता पाण्यात १५० फूट खाली डेंजरस स्थितीत आढळला होता. जिथे त्याला शार्कने घेरले होते. अक्षय म्हणाला होता की, त्याचा जीवही गेला असता. त्याला कोणताही शार्क खाऊ शकत होता.
अक्षयने केलं असं काही...
अभिनेत्याने त्या क्षणाची आठवण काढत सांगितले की, तो जखमी झाल्यानंतर सगळे घाबरला होता. त्याला ४०-४५ शार्क्सने घेरले होते. दोन शार्क तर त्याच्या रक्ताच्या वासामुळे आकर्षित होऊन जवळ आले होते. मात्र अक्षयने धीर बाळगत पोहत राहिला. तो म्हणाला की, जेव्हा शार्कला समोरच्याकडून धोका आहे, असे वाटते तेव्हाच हल्ला करतात.