अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:01 AM2024-10-08T11:01:24+5:302024-10-08T11:01:58+5:30

मल्टिस्टारर असलेला अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप झाला.

Akshay Kumar-led Khel Khel Mein is reportedly being released on Netflix on October 9 | अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित

मल्टिस्टारर असलेला अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप झाला. बिग बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली. आता 'खेल खेल में'  OTT वर रिलीज व्हायला सज्ज आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'खेल खेल में' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या 'खेल खेल में' सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे. 'खेल खेल में'सिनेमात एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत.  तगडे कलाकार असूनही सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता ओटीटवर हा सिनेमा गाजणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांचा हा चित्रपट २०१६मध्ये आलेल्या 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' या इटालियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात एक असा खेळ आहे जो ओळखीच्या चेहऱ्यांवरील मुखवटे फाडून टाकत त्यांच्या अंतरंगात दडलेले अनोळखी चेहरे समोर आणत थेट पर्दाफाश करतो.  एका नावीन्यपूर्ण संकल्पनेवर सुरेख पटकथा लिहिली आहे. मूळ चित्रपट जरी इंग्रजीत असला तरी मांडलेले मुद्दे भारतीय प्रेक्षकांना रिलेट होणारे आहेत. हा सिनेमा थिएटरमध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. 
 

Web Title: Akshay Kumar-led Khel Khel Mein is reportedly being released on Netflix on October 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.