अक्षय कुमारचा आवडता देशभक्तीपर सिनेमा कोणता? म्हणाला- "१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:41 IST2025-01-23T17:41:12+5:302025-01-23T17:41:36+5:30
अक्षय कुमारने आवडत्या देशभक्तीपर सिनेमामध्ये या जुन्या सिनेमाचं नाव घेतलं (akshay kumar)

अक्षय कुमारचा आवडता देशभक्तीपर सिनेमा कोणता? म्हणाला- "१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेस..."
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षयने आजवर विविध धाटणीच्या सिनेमातून प्रेक्षकांंचं मनोरंजन केलं. अक्षयच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमातील गाणी, टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेलीय. अशातच एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या आवडत्या देशभक्तीपर सिनेमाचा उल्लेख केलाय.
हा सिनेमा अक्षयला आवडतो
एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या आवडत्या देशभक्तीपर सिनेमाचं नाव घेतलं. १९७३ साली रिलीज झालेला 'हिंदुस्तान की कसम' हा अक्षयचा आवडता सिनेमा आहे. राज कुमार यांनी या सिनेमात भूमिका साकारली होती. अक्षय म्हणाला की, "हिंदुस्तान की कसम. अजय देवगणवाला नाही तर त्याच्या आधीचा सिनेमा. याही सिनेमात एअर फोर्स आणि आपल्या भारतीय आर्मीच्या दृष्टीकोनातून कथा रचली होती. माझ्या मते जास्त लोकांनी तो सिनेमा पाहिला नाही. या सिनेमात एक चांगलं गाणंही होतं. "
१९७१ दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धाची आठवण सांगताना अक्षय म्हणाला की, "मी तेव्हा ४ वर्षांचा होतो. त्यावेळी रस्त्यावर सायरन वाजत असायचे. तेव्हा आमचे कुटुंबीय आम्हाला टेबलखाली लपायला सांगायचे. कारण वरुन विमानं जात असत. मुंबईत अशा गोष्टी त्यावेळी घडायच्या." अक्षय कुमार-वीर पहारिया या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'स्काय फोर्स' हा सिनेमा २४ जानेवारीला रिलीज होतोय. भारतीय एअर फोर्समध्ये घडलेल्या सत्य घटनेवर हा सिनेमा आधारीत आहे.