मिशन राणीगंजचा धमाकेदार ट्रेलर! चाहते म्हणाले - 'अक्षयचा आणखी एक ब्लॉकबस्टर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 04:21 PM2023-09-25T16:21:47+5:302023-09-25T16:23:21+5:30
अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. अक्षयनं त्याच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. एका सत्य घटनेवर आधारित अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. अवघ्या काही मिनिटांतच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला लाखो व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले.
'मिशन राणीगंज'चा ट्रेलरची सुरुवात जमिनीखाली 350 फूट खाणीत अडकलेल्या मजुरांपासून होते. जेव्हा सर्वजण कामगार मेले असे गृहीत धरतात, तेव्हा अक्षय कुमार कामगारांना वाचवण्यासाठी ठोस योजना बनवतो. हा ट्रेल पाहून चाहत्यांनी अक्षयचे कौतुक केले आहे. अक्षयचा आणखी एक ब्लॉकबस्टर आला, असे एका चाहत्याने म्हटलं. तर हा चित्रपट ब्लॉकबास्टरचं ठरणार लिहून घ्या, असही एका चाहत्याने म्हटलं.
दिवंगत जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट आहे. 1989 मध्ये एका दगडी कोळशाच्या खाणीत अडकून बसलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी इंजिनिअर जसवंत हे ज्याप्रकारे स्वताच्या जीवाची बाजी लावतात, त्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. ही घटना बिहारच्या रानीगंजमध्ये घडली, ज्याला मिशन रानीगंज म्हणूनही ओळखले जाते.
यापूर्वी या चित्रपटाचे नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे होते. पण आता 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' असे चित्रपटाचे नवीन नाव आहे. मिशन राणीगंज सिनेमात अक्षय कुमार,परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा असे दिग्गज कलाकार झळकत आहेत. टिनू सुरेश देसाई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.