Then And Now : अक्षय कुमारची ‘ही’ हिरोईन 30 वर्षांपासून होती गायब, बघा आता कशी दिसते!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:00 AM2022-06-09T08:00:00+5:302022-06-09T08:00:02+5:30
Akshay Kumar Mr Bond Actress : 1992 साली आलेल्या ‘मिस्टर बॉन्ड’ या चित्रपटात ती अक्षयसोबत झळकली होती. ती कुठे आहे? काय करतेय? कळायला मार्ग नव्हता. पण 30 वर्षानंतर आत्ता कुठे तिच्याबद्दलची माहिती समोर आलीये....
Akshay Kumar Mr Bond Actress Ruchikaa Pandey : अक्षय कुमारने आपल्या 30 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. यापैकी काही अभिनेत्री आजही बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहेत. काही जणी मात्र गायब आहेत. अक्षयच्या (Akshay Kumar ) ‘अमानत’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री कंचन हिचा अद्यापही पत्ता नाही. कंचन सारखीच आणखी एक अभिनेत्रीही अनेक वर्षांपासून गायब होती. तिचं नाव रूचिका पांडे (Ruchikaa Pandey). 1992 साली आलेल्या ‘मिस्टर बॉन्ड’ या चित्रपटात अक्षयसोबत रूचिका पांडे झळकली होती. या एका चित्रपटानंतर अचानक ती गायब झाली होती. रूचिका कुठे आहे? काय करतेय? काहीही कळायला मार्ग नव्हता. पण 30 वर्षानंतर आत्ता कुठे तिच्याबद्दलची माहिती समोर आलीये.
30 वर्षांत रूचिका कमालीची बदलली आहे. इतकी की, पहिल्या नजरेत तुम्ही तिला ओळखू शकणार नाही. रूचिका सध्या कुठे आहे तर ती दुबईत राहते. आता ती अभिनेत्री नाही तर फॅशन डिझाईनर म्हणून ओळखली जाते. तिच्या इन्स्टाग्राम व फेसबुक प्रोफाईलनुसार, ती तिने डिझाईन केलेल्या कपड्यांचं प्रदर्शन भरवते. रूचिकाने ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटासाठी प्रीति झिंटा व अमीषा पटेल हिचे कपडे डिझाईन केले होते. या चित्रपटात तिने डिझाईनर व स्टायलिस्ट म्हणून काम केलं. रूचिका विवाहित आहे. याचवर्षी जानेवारीत तिने पतीसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
रूचिका पांडेने 1991 साली ‘यारा दिलदारा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती ‘भाभीजी घर पर है’ फेम आसिफ शेखसोबत दिसली होती. तिचा हा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. यानंतर ‘प्यार का सौदागर’ या चित्रपटात ती झळकली. पण हा चित्रपटही सुपरडुपर फ्लॉप ठरला.
1992 साली अक्षय कुमारच्या ‘मिस्टर बॉन्ड’मध्ये तिची वर्णी लागली. या चित्रपटात रूचिकाशिवाय अक्षयच्या अपोझिट डॉली मिन्हास व शीबा आकाशदीप अशा दोन अभिनेत्री होत्या. साहजिकच या दोघींपुढे रूचिका फिकी ठरली. हा चित्रपटही दणकून आपटला. बॉलिवूडमध्ये यश मिळत नाही म्हटल्यावर कदाचित रूचिकाने या इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला.