१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:04 AM2024-09-09T11:04:55+5:302024-09-09T11:05:59+5:30

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे (bhooth bangla)

Akshay Kumar new movie bhooth bangla directed by priyadarshan release date | १४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

'हेराफेरी', 'फिर हेरा फेरी', 'भागम् भाग', 'भूल भूलैय्या', 'खट्टा मिठा' असे सुपरहिट विनोदी सिनेमे देणारे दिग्दर्शक म्हणजे प्रियदर्शन. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रियदर्शन यांच्या सिनेमात एक कलाकार हमखास दिसतो  तो म्हणजे अक्षय कुमार. २०१० साली आलेल्या 'खट्टा मिठा' सिनेमानंतर मात्र या जोडीचा नवीन सिनेमा आला नव्हता. प्रेक्षकांना या दोघांच्या नव्या सिनेमाची आतुरता होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. १४ वर्षांनी प्रियदर्शन-अक्षय एकत्र येत असून 'भूत बंगला' या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

भूत बंगला सिनेमाची शानदार घोषणा

आज अक्षय कुमारचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने 'भूत बंगला' सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये अंधारी काळी रात्र, चंद्र, जुना वाडा आणि दूध चाटणारा अक्षय कुमार पाहायला मिळतोय. त्याच्या खांद्यावर काळी मांजर बसलेली दिसते. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलंय. अक्षय कुमारचा नवीन लूक सुद्धा चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. अशाप्रकारे १४ वर्षांनी अक्षय कुमार - प्रियदर्शन ही जोडी हॉरर कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.


या दिवशी रिलीज होणार 'भूत बंगला'

अक्षय कुमार - प्रियदर्शन जोडीचा 'भूत बंगला' सिनेमा ख्रिसमस २०२५ मध्ये रिलीज  होणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना अजून  वर्षभर या सिनेमाची वाट पाहायला लागणार आहे.  लवकरच या सिनेमाचं शूटींग सुरु होईल. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केलीय. या सिनेमात अक्षयसोबतच आणखी कोणते कलाकार दिसणार? प्रमुख अभिनेत्री कोण असणार? याचा उलगडा लवकरच होईल. अक्षय - प्रियदर्शन जोडीचा 'भूल भूलैय्या' सिनेमा चांगलाच गाजलेला. 'भूत बंगला' सुद्धा या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

Web Title: Akshay Kumar new movie bhooth bangla directed by priyadarshan release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.