'या' अभिनेत्याला सासूला घेऊन जायचं होतं रोमॅन्टिक डेटवर, जुना व्हिडीओ चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:57 IST2025-04-15T13:56:13+5:302025-04-15T13:57:25+5:30

एका अभिनेत्याला चक्क सासूसोबतच डेटवर जायचं होतं.

Akshay Kumar Once Wanted Take His Mother In Law Dimple Kapadia On A Romantic Date Know The Twist Throwback Video | 'या' अभिनेत्याला सासूला घेऊन जायचं होतं रोमॅन्टिक डेटवर, जुना व्हिडीओ चर्चेत!

'या' अभिनेत्याला सासूला घेऊन जायचं होतं रोमॅन्टिक डेटवर, जुना व्हिडीओ चर्चेत!

बॉलिवूडमध्ये कोण, कधी, काय बोलेल ते सांगता येत नाही. असाच एक अभिनेत आहे, ज्यानं थेट बायको नाही तर सासूला रोमॅन्टिक डेटवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्तक केली होती. त्या अभित्याचा जुन्हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे आणि यावरुन त्याला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत. 

तो अभिनेता खिलाडी कुमार अक्षय (Akshay Kumar) हा आहे. अक्षयनं आपली सासू डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांना डेटवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही वर्षांपुर्वी अक्षय कुमार हा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये पोहचला होता. यावेळी रॅपिड फायर राउंडमध्ये अक्षयला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. पण एक प्रश्न असा होता, ज्याचं अक्षयनं दिलेलं उत्तर करण जोहरही लाजला होता.   

रॅपिड फायर राउंडमध्ये करण जोहरने अक्षय कुमारला विचारलं की जर "तो विवाहित नसेल तर तो कोणत्या अभिनेत्रीला रोमँटिक डेटवर घेऊन जायला आवडेल?" यावर अक्षय कुमार वेळ न घेता डिंपल कपाडिया हे नाव घेतलं. अक्षय पुढे म्हणाला, "रात्र भर आम्ही त्यांच्या मुलीविषयी बोलणार".  हे ऐकल्यानंतर करण जोहर म्हणाला, "मला वाटतं तुझ्या पत्नीने तुला असं बोलायला शिकवलं आहे".

अक्षय आणि डिंपल कपाडिया यांच्यात सासू व जावई हे नातं असण्यासोबतच ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. अक्षय डिंपल यांची खूप मस्करी सुद्धा करतो. डिंपल या अक्षयला आपल्या मुलासारखं वागवतात. अक्षयही त्याचा खूप आदर करतो.  अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांच्यातील बॉन्डिंग अनेकदा दिसून आलं आहे. 
 

Web Title: Akshay Kumar Once Wanted Take His Mother In Law Dimple Kapadia On A Romantic Date Know The Twist Throwback Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.