तुम्ही पाहिलात का अक्षय कुमारचा हा व्हिडिओ ? येणार का ‘टॉयलेट’ पार्ट2?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 01:07 PM2018-07-01T13:07:31+5:302018-07-01T13:08:45+5:30

 होय, अक्षयने ९ सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अक्षय एका टॉयलेटसमोर उभा आहे.

akshay kumar posted a video on his twitter handle regarding toilet2 | तुम्ही पाहिलात का अक्षय कुमारचा हा व्हिडिओ ? येणार का ‘टॉयलेट’ पार्ट2?

तुम्ही पाहिलात का अक्षय कुमारचा हा व्हिडिओ ? येणार का ‘टॉयलेट’ पार्ट2?

googlenewsNext

अक्षय कुमारचा ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर चांगलाच गाजला होता. स्वच्छ भारत अभियानावर आधारित या चित्रपटाने अगदी साध्या-सोप्या कथेच्या माध्यमातून एक मोठा संदेश दिला होता. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर या दोघांची एक लाघवी प्रेम कथा आणि जोडीला एक मोठा सामाजिक संदेश असा हा चित्रपट सगळ्यांच्याच पसंतीला उतरला होता. ही इतकी पार्श्वभूमी सांगण्यामागचे कारण म्हणजे, लवकरच ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’च्या धर्तीवर नवे काही आणण्याची घोषणा अक्षयने केली आहे. होय, अक्षयने ९ सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अक्षयने ही घोषणा केली आहे.


 या व्हिडिओत अक्षय एका टॉयलेटसमोर उभा आहे. ‘टायॅलेट तो बना लिया, पर कथा अभी बाकी है़ मैं ला रहा हूं टॉयलेट पार्ट2’, असे अक्षय यात म्हणतो आहे. आता हा ‘टॉयलेट पार्ट2’ चित्रपट आहे की आणखी काय, हे अक्षयने पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवले आहे. अनेकांच्या मते, अक्षय ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’चा दुसरा भाग नाही तर या मुद्याशी संबंधित वेगळेच काही चाहत्यांसमोर आणणार आहे. आता ते काय असेल, हे लवकरच कळणार आाहे.
तूर्तास अक्षय प्रचंड बिझी आहे. ‘हाऊसफुल4’ आणि ‘केसरी’ या त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटींग सुरू आहे. येत्या १५ आॅगस्टला अक्षयचा ‘गोल्ड’ रिलीज होतो आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अक्षय व्यस्त आहे.  ‘गोल्ड’ हा हॉकीवर आधारित चित्रपट आहे.  स्वतंत्र देशाच्या रूपात भारताने आॅलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते. आॅलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न असलेल्या भारतीय हॉकी टीमच्या खेळाडूंची गोष्ट आहे. यात अक्षय कुमार हॉकी कोचच्या भूमिकेत आहे.   ट्रेलरमध्ये मौनी राय हिचीही एक झलक पाहायला मिळते आहे.

 

Web Title: akshay kumar posted a video on his twitter handle regarding toilet2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.