Ram Setu Box Office Collection Day 1: ‘राम सेतू’चा मोठा धमाका, अक्षयच्या सिनेमानं पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 01:49 PM2022-10-26T13:49:10+5:302022-10-26T13:53:10+5:30
Ram Setu Box Office Collection Day 1: अक्षयच्या सिनेमाला शानदार ओपनिंग मिळालं आहे. ‘राम सेतू’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
Ram Setu Box Office Collection Day 1: दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा चित्रपट भलताच आवडला आहे तर काहींनी सो-सो म्हणलं आहे. पण कमाईच्या बाबतीत म्हणाल तर अक्षयच्या या सिनेमाला शानदार ओपनिंग मिळालं आहे.
‘राम सेतू’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15.25 कोटींची कमाई केली आहे. याचसोबत हा सिनेमा अक्षयचा यावर्षीचा बेस्ट ओपनर सिनेमा ठरला आहे.
#Diwali versus #Diwali *post-pandemic*… *Day 1* biz…
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2022
⭐️ 2021: #Sooryavanshi ₹ 26.29 cr [50% occupancy in #Maharashtra]
vs.
⭐️ 2022: #RamSetu ₹ 15.25 cr
⭐️ 2022: #ThankGod ₹ 8.10 cr pic.twitter.com/3S0j1N2nxI
अक्षयचे याआधी आलेले तीन सिनेमे फार कमाल दाखवू शकले नव्हते. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेत. अशात सगळ्यांच्या नजरा अक्षयच्या ‘राम सेतू’वर लागल्या होत्या. सुरूवात चांगली झालीये. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो? किती हिट होतो, ते बघूच.
अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ने केली निराशा
25 ऑक्टोबरला (गुरुवारी) दोन बिग बजेट हिंदी सिनेमे रिलीज झालेत. अक्षयचा ‘राम सेतू’ आणि अजय देवगण (Ajay Devgn) व सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’. ‘राम सेतू’ला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. पण अजयचा ‘थँक गॉड’ मात्र फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 8.10 कोटी रुपये कमाई केली.
अक्षच्या चित्रपटामुळे ‘थँक गॉड’च्या (Thank God ) कमाईवर परिणाम झाला असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 70 कोटी रुपये आहे. ‘थँक गॉड’ एक फँटसी ड्रामा आहे. इंद्र कुमारने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणने या चित्रपटात चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा व रकुल प्रीत सिंग पती-पत्नीच्या भूमिकेत आहे. ज्यांच्या कर्माचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्ताने वेगळंच प्लानिंग केलं आहे.