शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात पोहचला अक्षय कुमार, साईबाबांच्या चरणी झाला नतमस्तक; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:55 IST2023-01-25T14:28:14+5:302023-01-25T15:55:53+5:30
अक्षय कुमारने साई मंदिरात पोहोचल्यानंतर साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात पोहचला अक्षय कुमार, साईबाबांच्या चरणी झाला नतमस्तक; फोटो व्हायरल
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा 'सेल्फी’ला घेऊन चर्चेत आहे. अलिकडेच त्याच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याच दरम्यान अभिनेता शिर्डीला पोहोचला आहे. शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेतानाचा अक्षय कुमारचा फोटो समोर आला आहे. यात तो सफेद शर्ट आणि राखाडी कलरच्या पटँमध्ये दिसतोय.
अभिनेता साई मंदिरात पोहोचला तेव्हा तेथे प्रचंड गर्दी होती, गर्दीसह अक्षय कुमारने साई मंदिरात पोहोचल्यानंतर साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. अभिनेता अक्षय कुमार हा साईबाबांचा भक्त आहे, याआधीही त्याने अनेकवेळा साईबाबांच्या दर्शनासाठी आपण गेलेला पाहिला आहे. दरवर्षी अनेक साई भक्त शिर्डीला येतात. सेलिब्रेटीही याला अपवाद नाहीत.
अक्षयच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर राज मेहता दिग्दर्शित सेल्फीमध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत. दोघांनाही एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटी यांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला ‘सेल्फी’ प्रदर्शित होणार आहे.