​अक्षय कुमारने सांगितले आयुर्वेदाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 04:29 PM2017-02-23T16:29:00+5:302017-02-23T21:59:00+5:30

मला अ‍ॅलोपॅथीपासून कोणताही त्रास नाही. मात्र आपण आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीला का विसरत चाललो आहोत? असा सवालही त्याने केला.

Akshay Kumar said benefits of Ayurveda | ​अक्षय कुमारने सांगितले आयुर्वेदाचे फायदे

​अक्षय कुमारने सांगितले आयुर्वेदाचे फायदे

googlenewsNext
लिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना आयुर्वेदाचे फायदे सांगितले आहेत. मागील २५ वर्षांपासून मी आयुर्वेदाला फॉलो करीत असून नुकताच मी केरळच्या आयुर्वेदिक आश्रमात १४ दिवस राहून आलो असल्याचे सांगून लोकांनी आयुर्वेदाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. 

अभिनेता अक्षय कुमार आपल्या चाहत्यांशी फेसबुकवरून नेहमीच संवाद साधत असतो. यावेळी त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडीओ शेअर करताना आयुर्वेद व त्याला आलेल्या या उपचार पद्धतीचे फायदे सांगितले आहे. पाच मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये अक्षय बिछान्यावर झोपलेला दिसतो आहे. अक्षयने आपल्या संभाषणाची सुरुवात करताना ‘जॉली एलएलबी २’च्या यशासाठी चाहत्यांचे आभार व्यक्त करून अक्षय म्हणाला, मी नुकताच केरळच्या एका आश्रमात १४ दिवस राहून आलो आहे. या दरम्यान मी शहरातील गोंगाटापासून दूर होतो. तेथे ना टीव्ही, ना फोन, ना ब्रँडेट कपडे, केवळ साधा वेश व साधे जेवन मी घेतले. मी मागील २५ वर्षांपासून आयुर्वेदाला फॉलो करीत आहे. मी जेथे होतो तेथे अनेक विदेशी लोक उपचार करण्यासाठी आले होते. 



अक्षय म्हणाला, जसे तुम्ही कधी कधी आपल्या बाईक आणि कारची सर्व्हिसिंग करता तशीच मी माझ्या शरीराची सर्व्हिसिंग केली आहे. लोकांना या गोष्टीचा अंदाज लावताच आला नाही की, आयुर्वेदाच्या रूपाने देवाने आपल्या देशाला किती मोठा खजाना दिला आहे. लोकांनी आयुर्वेदाचे महत्त्व समजले पाहिजे. मला अ‍ॅलोपॅथीपासून कोणताही त्रास नाही. मात्र आपण आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीला का विसरत चाललो आहोत? असा सवालही त्याने केला. 



अक्षयने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, मी कोणत्याच आयुर्वेदिक कंपनीच्या ब्रँडचा प्रचार करीत नाही मी केवळ यासाठी सांगतो आहे कारण मी आयुर्वेदाचे फायदे अनुभवले आहेत. या वर्षी अक्षयचे चार चित्रपट रिलीज होणार असून या मालिकेतील पहिला चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ हा सुपरहिट ठरला आहे. यानंतर त्याचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, रजनीकांतसोबतचा २.० व त्यानंतर अरुणाचलम मुरुगुनाथम यांच्या जीवनावर आधारित ‘पॅडमॅन’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. याशिवाय तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या ‘नाम शबाना’मध्ये  अक्षयचा किमिओ अपेरिअंस असणार आहे. 

">http://

Web Title: Akshay Kumar said benefits of Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.