बेंगरुळू घटनेवर अक्षय कुमार संतापला ; माणूस असल्याची लाज वाटतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 09:30 PM2017-01-05T21:30:30+5:302017-01-06T10:21:36+5:30
bangalore molestation incident akshay kumar anger ; बंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये नंगा नाच पाहिला, भर रस्त्यात ते पाहून तुम्हाला कसं वाटलं हे माहित नाही, पण माझं रक्त खवळलं. एका मुलीचा बाप आहे. जरी नसतो तरी हेच बोललो असतो की, जो समाज आपल्या महिलांना आदर देऊ शकत नाही त्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही.’
न ्या वर्षाचा जल्लोष सुरू असताना बंगळुरुमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंगाच्या घटना घडल्या व एका तरुणीची भर रस्त्यात छेडछाड झाली. या प्रकारावर राजकीय नेत्यांनी दिलेल्या बेताल वक्तव्यावर बॉलिवूड संतापले असून अनेक कलावंतांनी आपला निषेध नोंदविला आहे. आमिर खानपासून ते सलमान खानचे वडील सलीम खान यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.याच पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने ‘मला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटते’ असे विधान करित संताप व्यक्त केला आहे.
अक्षय कुमारने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून आपले मत मांडले आहे.अक्षय कुमार म्हणाला, ‘आज मला माणूस असल्याची लाज वाटतेय. कुटुंबासोबत छोटी सुट्टी एन्जॉय करुन केपटाऊनहून परतलो. तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलीला कुशीत घेऊन एअरपोर्टवरुन बाहेरच पडत होतो, तोपर्यंत टीव्हीवरील एका बातमीवर नजर गेली. बंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये नंगा नाच पाहिला, भर रस्त्यात ते पाहून तुम्हाला कसं वाटलं हे माहित नाही, पण माझं रक्त खवळलं. एका मुलीचा बाप आहे. जरी नसतो तरी हेच बोललो असतो की, जो समाज आपल्या महिलांना आदर देऊ शकत नाही त्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही.’
अक्षय कुमारने राजकीय नेत्यांच्या बेताल विधानांचाही चांगलाच समाचार घेतला तो म्हणाला, मुलीने तोकडे कपडे का घातले?मुलगी घराबाहेर का पडली? अरे मनात थोडी लाज ठेवा,मुलीचे कपडे छोटे नाही,तुमचे विचार छोटे आहेत.अशी घटना कुणासोबतही होऊ नये. हे लोक इतर कुठून आलेले नाहीत. ते नराधम आपल्यामध्येच आहेत. ज्या दिवशी या देशाची मुलगी पलटवार करेल ना, त्यावेळी तुमची अक्कल ठिकाणावर येईल. मुलींनी मार्शल आर्ट शिकून प्रतिकार करण्याची हिमंत बाळगावी असेही अक्षय म्हणाला.
मुलींनी आवाहन करताना अक्षय कुमार म्हणाला, मुलींनो तुम्ही कोणापेक्षाही मागे नाही.अलर्ट राहा,स्वरक्षण शिका,पुढील वेळेला जर कोणीही तुम्हाला कपड्यांवर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्पष्ट सांगा की,तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव.