तीन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून गायब झाली अक्षयची पहिली हिरोईन; तरूणपणी झाली विधवा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:32 PM2018-09-09T20:32:56+5:302018-09-09T20:36:10+5:30

अक्षयच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट होती अभिनेत्री शांतीप्रिया. 

akshay kumar saugand movie first actress shanthipriya widow at age of 35 | तीन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून गायब झाली अक्षयची पहिली हिरोईन; तरूणपणी झाली विधवा!!

तीन चित्रपटांनंतर बॉलिवूडमधून गायब झाली अक्षयची पहिली हिरोईन; तरूणपणी झाली विधवा!!

googlenewsNext

आज अक्षय कुमार आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय. गेल्या २६ वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह असलेल्या अक्षयच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट होती अभिनेत्री शांतीप्रिया. शांतीप्रियाची आणखी दुसरी ओळख म्हणजे, साऊथ अभिनेत्री भानुप्रियाची ती बहीण. शांतीप्रियानेही आपल्या बॉलिवूूड करिअरची सुरूवात ‘सौगंध’पासून केली. अक्षय आणि शांतीप्रिया दोघांचाही हा डेब्यू सिनेमा होता. या चित्रपटानंतर अक्षयने एकापाठोपाठ एक चित्रपट केलेत. अनेक हिट चित्रपट दिलेत. आजही हा ‘सिलसिला’ सुरूचं आहे. पण अक्षयप्रमाणे शांतीप्रियाला मात्र स्टारडम निर्माण करणे जमले नाही.

 ‘सौगंध’नंतर तीन चित्रपटात ती दिसली. पण या तीनचं चित्रपटानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ‘सौगंध’नंतर शांतीप्रियाने ‘वीरता’ आणि ‘इक्के पे इक्का’ हे दोन चित्रपट केलेत आणि त्यानंतर ती दिसलीच नाही.

१९९९ मध्ये शांतीप्रियाने बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ रे याच्यासोबत लग्न केले. सिद्धार्थने बाजीगर चित्रपटात काजोलचा मित्र आणि इन्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका साकारली होती. पण दुदैवाने सिद्धार्थचे ऐन चाळीशीत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यावेळी शांतीप्रिया केवळ ३५ वर्षांची होती. दोघांनाही दोन मुले आहेत.
बॉलिवूडमधून शांतीप्रिया गायब झाली, यानंतर साऊथमध्ये मात्र तिने काम केले. याशिवाय मुकेश खन्नाच्या आर्यमान, माता की चौकी, द्वारकाधीश अशा मालिकांत ती दिसली.

Web Title: akshay kumar saugand movie first actress shanthipriya widow at age of 35

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.