अक्षय कुमार म्हणतो, अर्शदने साकारलेला जॉली ठरला माझ्यासाठी मार्गदर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 02:56 PM2017-02-08T14:56:17+5:302017-02-09T15:49:46+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आगामी जॉली एलएलबी २ या चित्रपटात वकिलाची भूमिकेत दिसणार आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसीने साकारलेली ...
ब लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आगामी जॉली एलएलबी २ या चित्रपटात वकिलाची भूमिकेत दिसणार आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसीने साकारलेली भूमिका यावेळी अक्षय कुमार साकारत आहे. जॉली एलएलबी २ प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच अक्षय कुमारने अर्शद वारसीबद्दल मोठा खुलासा केला आहे. अर्शदमुळे मला जॉली साकारणे सोपे झाले, असे अक्षय कुमारने सांगितले.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटातील अर्शद वारसीने साकारलेला जॉली चाहत्यांना चांगलाच पसंत पडला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. जॉली एलएलबीच्याा सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीची भूमिका साकारत आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अर्शद वारसीचे आभार मानले आहे. अक्षय म्हणला, जॉलीच्या पहिल्या भागात अर्शद वारसीने साकारलेली भूमिका माझ्यासाठी मार्गदर्शक ठरली. या भूमिकेसाठी मला फारशी तयारी करावी लागली नाही.
अक्षय म्हणाला, अर्शदने साकारलेली भूमिका मी पाहिली, यामुळे माझ्यासाठी हे काम अधिक सोपे ठरले. मला ही भूमिका कशी साकारायची आहे याची मला कल्पना आली. दिग्दर्शक सुभाष कपूर राजकीय पत्रकार असल्याने त्यांना या अशा घटनांचा अधिक अभ्यास आहे, मी केवळ त्यांचे अनुसरण केले. दिग्दर्शक सुभाष कपूरने जे सांगितले ते मी केले. या चित्रपटाची भाषा उत्तर भारतातील आहे. मी स्वत: या भागाचा असल्याने माझ्या भाषेवर उत्तर प्रदेशचा पगडा आहे. हिंदीवर माझी चांगली पकड आहे. यामुळे फारशी मेहनत करावी लागली नाही.
जॉली एलएलबी २च्या शूटिंगचे अनुभव शेअर करताना अक्षय कुमार म्हणाला, आम्ही या चित्रपटाची शूटिंग लखनौमध्ये केली हे ठिकाण मला आवडले, शूटिंग दरम्यान आम्हाला कोणतिच अडचण आली नाही. मी उत्तर प्रदेशात आगामी टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाची शूटिंग करीत आहे. आम्ही यासाठी मथुरा हे शहर निवडले. अक्षय कुमार, हुमा कुरेशी व अन्नू कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबी २ हा चित्रपट शुक्रवार १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.