OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..."

By पंकज प्रकाश जोशी | Published: August 14, 2023 08:50 AM2023-08-14T08:50:34+5:302023-08-14T08:51:37+5:30

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीने नुकतीच एका थिएटरमध्ये हजेरी लावली.

akshay kumar says omg 2 first adult movie made for teenagers it should be shown in schools | OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..."

OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, "पहिला अडल्ट सिनेमा जो..."

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाबाबतीत प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी कांतीलालची भूमिका साकारली असून अक्षय कुमार (Akshay Kumar) भगवान शंकराचा दूत दाखवण्यात आला आहे. सिनेमा 'सेक्स एज्युकेशन'वर भाष्य करतो. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार मात्र नाराज झाला आहे. हा पहिलाच अडल्ट सिनेमा आहे जो टीनएजर्ससाठी बनवण्यात आला आहे अशा शब्दात अक्षयने नाराजी व्यक्त केली.

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीने नुकतीच एका थिएटरमध्ये हजेरी लावली. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. लहान मुलांनीही हा सिनेमा पाहण्याची गरज आहे. सिनेमाला यु/ए सर्टिफिकेट द्यायला हवं होतं अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. पंकज त्रिपाठीने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. तर शेवटी अक्षय कुमारही प्रेक्षकांसमोर आला. तो म्हणाला, 'कसा वाटला तुम्हाला सिनेमा? खरं तर हा पहिलाच अडल्ट सिनेमा आहे जो टीनएजर्ससाठी बनवण्यात आला आहे. हा सिनेमा शाळेत दाखवला पाहिजे. पण ठिके तुम्ही सगळे आलात त्याबद्दल आभार. हर हर महादेव.'

अक्षय कुमारला थिएटरमध्ये पाहून चाहते खुश होतात. तर अभिनेत्याने पहिल्यांदाच सेन्सॉर बोर्डावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ३ दिववसांपूर्वी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाने आतापर्यंत 25.56 कोटींची कमाई केली आहे. तर त्याच दिवशी सनी देओलचा 'गदर 2' देखील रिलीज झालाय. या सिनेमाने देखील थिएटरमध्ये गदर केला आहे. 

Web Title: akshay kumar says omg 2 first adult movie made for teenagers it should be shown in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.