अक्षय कुमारने सेट केलं श्रेयसचं रुटिन, अभिनेता म्हणाला- "सकाळी ७.३० वाजता नाश्ता केल्यावर आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 12:06 PM2024-11-04T12:06:43+5:302024-11-04T12:08:06+5:30

श्रेयस तळपदेने अक्षय कुमारच्या मदतीने त्याच्या दैनंदिन दिनक्रमात मोठा बदल केलाय (shreyas talpade, akshay kumar)

Akshay Kumar sets up Shreyas talpade daily routine after heart attack video viral | अक्षय कुमारने सेट केलं श्रेयसचं रुटिन, अभिनेता म्हणाला- "सकाळी ७.३० वाजता नाश्ता केल्यावर आम्ही..."

अक्षय कुमारने सेट केलं श्रेयसचं रुटिन, अभिनेता म्हणाला- "सकाळी ७.३० वाजता नाश्ता केल्यावर आम्ही..."

अभिनेता श्रेयस तळपदे हा बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री गाजवणारा लोकप्रिय अभिनेता. 'झुकेगा नही साला' म्हणत श्रेयसने साऊथ इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला. श्रेयसला गेल्या वर्षी 'वेलकम टू जंगल' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आलेला. पण त्यातून श्रेयस ठणठणीत बरा झाला. आजवरच्या करिअरमध्ये एक चांगला दैनंदिन दिनक्रम फॉलो करण्यास श्रेयसला अक्षय कुमारने चांगलीच मदत केली.

अक्षय कुमारने श्रेयसला केली मदत

कॅचअप या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, "पहिल्या दिवसापासून अक्षयने साधारण मला ताब्यात घेतलं होतं. आणि माझ्या जेवणा-खाण्याच्या, वर्कआऊटच्या सवयीचं त्यांनी मला एक रुटिन सेट करुन दिलं. सकाळी ७.३० वाजता आम्ही नाश्ता करायचो. अक्षय त्याआधी व्यायाम वगैरे करुन सगळं यायचा. मग आम्ही ७.३० ला नाश्ता करायचो. आणि जेवणासाठी पण त्याची सगळी टीम असते. त्यामुळे जेवण पण सांगून माझ्यासाठी वेगळं करुन घ्यायचा. आणि मग ते salads वगैरे वगैरे. हे करुन आम्ही १२.३० वाजता जेवायचो." 


श्रेयस पुढे म्हणाला, "आणि मग संध्याकाळी ६.३० वाजता सेम जेवण तयार असायचं. मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता पुन्हा नाश्त्याला भेटायचो. अक्षयने मला एक रुटिन सेट करुन दिलं i think that has touchwood! मला त्याची खूप मदत झाली." अशाप्रकारे श्रेयसने मुलाखतीत अक्षय कुमारचे आभार मानले. श्रेयस सध्या अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Akshay Kumar sets up Shreyas talpade daily routine after heart attack video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.