रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:00 PM2024-07-06T16:00:07+5:302024-07-06T16:01:40+5:30

आज रणवीर सिंगचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अक्षयने शेअर केलेला रणवीरचा व्हिडीओ चर्चेत आहे (akshay kumar, ranveer singh)

Akshay kumar shared a funny video while wishing Ranveer singh on his birthday | रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

रणवीर सिंगचा आज वाढदिवस. रणवीरला आपण विविध सिनेमात अभिनय करताना बघितलंय. रणवीरचे सिनेमे म्हणजे पॉवरहाऊसचं पॅकेज असं म्हटलं जातात. रणवीरचे जगभरातले चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेता अक्षय कुमारने रणवीरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात अक्षय - रणवीर धमाल डान्स करताना दिसत आहेत. 

अक्षय-रणवीरचा खास व्हिडीओ

अक्षय कुमारने इंन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत रणवीरच्या खांद्यावर स्पीकर आहे. अक्षय-रणवीर दोघेही ब्लॅक थीममध्ये दिसत आहेत. अक्षय-रणवीर दोघेही अजबगजब डान्स स्टेप्स करताना दिसतात. डान्स करता करता दोघही एका बिल्डिंगमध्ये थांबतात. त्या बिल्डिंगवर 'पावर हाउस, ट्रांसफार्मर 2' असं लिहिलेलं असतं. रणवीर-अक्षयच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करुन पसंती दिलीय.

अक्षयने रणवीरला दिल्या खास शुभेच्छा

 

हा व्हिडीओ शेअर करुन अक्षय कुमारने कॅप्शन लिहिलंय की, "या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जो एनर्जीचा पॉवर हाऊस आहे. आशा आहे की तुझी ही सकारात्मक ऊर्जा तुला पुढे घेऊन जाण्यास नेहमीच मदत करेल. तुझा दिवस एका खास पद्धतीने एन्जॉय कर. तुला खूप प्रेम आणि प्रार्थना." या व्हिडिओला दोघांच्याही चाहत्यांनी खूप पसंती दिली असून अनेकजण रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Akshay kumar shared a funny video while wishing Ranveer singh on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.