एका फॅनने शेअर केला अक्षयचा २८ वर्ष जुना ऑटोग्राफ, अभिनेता म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 16:29 IST2020-09-10T16:26:21+5:302020-09-10T16:29:27+5:30
एका फॅनने त्याचा अक्षयसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. त्यासोबत अक्षयचा ऑटोग्राफही आहे. २८ वर्षाआधी एका फॅनला दिलेला हा ऑटोग्राफ पाहून अक्षय चांगला इम्प्रेस झाला.

एका फॅनने शेअर केला अक्षयचा २८ वर्ष जुना ऑटोग्राफ, अभिनेता म्हणाला....
अक्षय कुमारने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सने त्याला शुभेच्छा दिल्या. अशात एका फॅनच्या ट्विटमुळे अक्षय फारच खूश झाला. एका फॅनने त्याचा अक्षयसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. त्यासोबत अक्षयचा ऑटोग्राफही आहे. २८ वर्षाआधी एका फॅनला दिलेला हा ऑटोग्राफ पाहून अक्षय चांगला इम्प्रेस झाला.
या ट्विटमध्ये लिहिले होते की, हॅपी बर्थडे माझ्या फेवरेट हिरो अक्षय कुमार. मी तुमचा तेव्हापासून फॅन आहे. जेव्हा खिलाडी सिनेमा आला होता. हा फोटो दीदार सिनेमाच्या सेटवर काढला होता. या सिनेमाचं शूटींग जुहूतील आनंद बंगल्यात सुरू होतं. ऑल दी बेस्ट लक्ष्मी बॉम्बची वाट पाहत आहे.
Wow! Thank you so much for sharing and the wishes 😁 https://t.co/SG64QDwzZx
— Akshay Kumar (@akshaykumar) September 10, 2020
अक्षय कुमारने त्याच्या फॅनच ट्विट रिट्विट केलं आणि त्याचे आभार मानले. अक्षयलाही इतके वर्ष जुना स्वत:चा ऑटोग्राफ पाहून बराच आनंद झाला. दरम्यान वाढदिवसानिमित्ताने बेलबॉटमच्या निर्मात्यांनी या सिनेमातील त्याचा लूक शेअर केला होता. या सिनेमात अक्षय कुमार वाणी कपूरसोबत दिसणार आहे. या सिनेमात ८० च्या दशकातील एक कथा आहे. यात प्लेन हायजॅकची एक कथा असल्याची चर्चा आहे.
बेल बॉटमसोबत अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची चर्चा सुरू होती. पण नंतर असं काही नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच अक्षय बऱ्याच वर्षांनंतर कतरिना कैफसोबत रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. पण हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार की थिएटरमध्ये याबाबत काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.
हे पण वाचा :
अॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’
अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?
'या' व्यक्तीने पाजला अक्षय कुमारला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा, व्हिडीओ व्हायरल