अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे अचानक लागले भिकारी, अन् त्याची उडाली भंबेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:54 IST2019-08-26T18:54:00+5:302019-08-26T18:54:28+5:30
अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया व सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान डिनरसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या मागे भिकारी लागले होते.

अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे अचानक लागले भिकारी, अन् त्याची उडाली भंबेरी
बॉलिवूडचे स्टार किड्स काहीना काही कारणास्तव चर्चेत येत असतात. त्यात आता बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटीया व सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम नुकतेच चर्चेत आले आहे. आरव भाटिया व इब्राहिम अली खान डिनरसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या मागे भिकारी लागले होते.
खरंतर ते दोघं डिनरसाठी गेलं होते. डिनरनंतर ते हॉटेल बाहेर पडल्यानंतर तिथे पॅपाराझी तर फोटो क्लिक करण्यासाठी उपस्थित तर होते. पण तिथे काही भिकारीदेखील होते. त्यांनी इब्राहीम व आरवला पाहताच त्यांच्याकडे धावून गेले आणि पैसे मागू लागले. त्या दोघांनाही त्यांचा पीछा कसा सोडवायचा हे कळत नव्हते. त्यावेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.
त्यातील फोटोंमध्ये इब्राहीम अजिबात त्रस्त झाला नाही. उलट तो हसताना दिसतो आहे. मात्र आरवला ही परिस्थिती कशी सांभाळायची हे कळत नव्हते.
आरव गाडीत बसल्यावर त्याच्या गाडीच्या इथे भिकारी जमले. आरवला त्यांचा सामना कसा करावा हे समजतच नव्हते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.