अजय देवगणच्या एंट्रीमुळे अक्षय कुमाराला या चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 10:50 AM2018-03-14T10:50:03+5:302018-03-14T16:20:03+5:30
सध्या अजय देवगण आपला आगामी चित्रपट 'रेड'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अजय गेल्या 27 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले ...
स ्या अजय देवगण आपला आगामी चित्रपट 'रेड'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अजय गेल्या 27 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' होता. हा चित्रपट त्याच्या आधी अक्षय कुमारने साईन केला होता. अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवत यात अजय देवगणला घेण्यात आले. यविषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, मी चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत चित्रपटात होतो. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय देवगणने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. मला काहीही न सांगता या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले.
तर अजय याचित्रपटाबाबत बोलताना म्हणाला, ''मला नाही माहिती यातले खरं नक्की काय आहे. मला सांगण्यात आले अक्षय कुमार नावाचा एक मुलगा हा चित्रपट करत होता मात्र एक मोठ्या चित्रपटाच्या चक्करमध्ये त्यांने 'फुल और कांटे' सोडून दिला. मला माझ्या वडिलांनी सांगितला तुला हा चित्रपट करायचा आहे.'' अजय पुढे म्हणाला की.'' मी त्यावेळी 18 वर्षांचा होतो मला चित्रपटात काम करायचे ही नव्हते. तेव्हा अक्षयला मी ओळखत देखील नव्हतो. त्यांनी नकार दिला म्हणून मी हा चित्रपट केला.'' अजयने या चित्रपटात अॅक्शन आणि रोमांससोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता जो प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. अजयचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. त्यावेळी अजयच्या एंट्रीमुळे जॅकी श्रॉफ, सनी देओल आणि सुनील शेट्टी यांच्या करिअरवर त्याचा परिणाम झाला होता.
ALSO READ : Happy Marriage Anniversary : अजय देवगणने लग्नात काजोलसमोर ठेवली होती ‘ही’ अट!
अजय त्याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटात इन्कम टॅक्स आॅफिसरची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट लखनऊ बेस्ड असून, एका सत्य घटनेवर आधारित आहे. १९८१ मध्ये देशातील सर्वात मोठ्या हाय प्रोफाइल इन्कम टॅक्स रेडशी संबंधित चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात इलियान डिक्रूज अजयसोबत स्क्रिन शेअर करीत आहे. सौरभ शुक्ला निगेटिव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे.