अक्षय कुमारला घडवण्यामागे ट्विंकल खन्नाचा नाही तर 'या' अभिनेत्रीचा आहे हात? कोण आहे 'ती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 15:40 IST2020-02-28T15:25:50+5:302020-02-28T15:40:09+5:30
अक्षय कुमार एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच अक्की एक आदर्श पती आणि आदर्श पिताही आहे.

अक्षय कुमारला घडवण्यामागे ट्विंकल खन्नाचा नाही तर 'या' अभिनेत्रीचा आहे हात? कोण आहे 'ती'
अभिनेता अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. त्याचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग यासह त्यांच्या स्टंट्सचे सारेच फॅन आहेत. एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच अक्की एक आदर्श पती आणि आदर्श पिताही आहे. गेल्या काही वर्षात अक्षय कुमारचा रुपेरी पडद्यावर चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. त्याच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीचं कलेक्शन केलं आहे. वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे.
दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे. आज आघाडीचा अभिनेता बनलेला अक्षय कुमारला घडवण्यामागे ट्विंकल खन्नाचा नाही तर पूजा बत्रा या अभिनेत्रीने हात आहे. पूजाने 1993 साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर पूजा मॉडेलिंगमध्ये आली आणि नंतर बॉलिवूडमध्ये. तिचे ‘विरासत’ व अन्य काही सिनेमा हिट झालेत. अक्षय कुमारला इंडस्ट्रीत कुणीही ओळखत नव्हते. मॉडलिंगच्या दिवसात अक्षय आणि पूजाची ओळख झाली होती. असे ही म्हटले जाते कि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये पूजा बत्रामुळे अक्षय कुमारला एंट्री मिळायची. आज अक्षय बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही. पण स्ट्रगलच्या काळात अक्षयने पूजासोबत पार्ट्यांना जाणे सुरु केले आणि इंडस्ट्रीतील अनेकांशी ओळख वाढवली.
करिअरच्या सुरूवातीला पूजानेच अक्षयला मदतीचा हात दिला. जिथे जिथे तिच्या ओळखी होत्या तिथे ती अक्षयची शिफारस करत काम मिळवून द्यायची. मात्र जेव्हा अक्षयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे यश मिळवले तेव्हा तो पूजा पासून लांब गेला. काही काळानंतर पूजाही सिनेसृष्टीपासून लांब जात सर्जन सोनू आहलूवालियासोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 9 वर्षांनंतर पूजाने सोनूपासून घटस्फोट घेतला. पूजा आई बनायला तयार नव्हती, याचमुळे पतीसोबत तिचे मतभेद निर्माण झाले आणि पुढे तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पूजाने अभिनेता नवाब शहासह लग्न करत बिझी झाली आहे.