अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 19:27 IST2019-03-19T19:26:32+5:302019-03-19T19:27:15+5:30
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली.

अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली. इतकेच नाही तर यावेळी तो जवानांसोबत थिरकताना देखील दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार 'केसरी'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार व परिणीती चोप्रा दिल्लीत पोहचले आहेत आणि तिथे त्यांनी जवानांसोबत वेळ व्यतित केला. त्याशिवाय जवानांसोबत केसरीमधील गाण्यावर अक्षयने डान्सदेखील केला. अक्षयने हा व्हिडिओ शेअर करीत जवानांसाठी छान मेसेजही लिहिला.
याव्यतिरिक्त दुसऱ्या व्हिडिओत अक्षय जवान महिलांसोबत फाइटिंग करताना दिसतो आहे. त्यानंतर त्यांना प्रेमाने गळाभेटदेखील घेतली. अक्षयच्या व्हिडिओवर त्यांचे चाहते छान छान कमेंट करत आहेत.
अक्षयच्या 'केसरी' चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांची खूप पंसती मिळते आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका करतो आहे.
या चित्रपटाची कथा १८९७ साली झालेल्या सारागढी युद्धावर आधारीत आहे. या युद्धात २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणी सैनिकांचा सामना केला होता आणि यात जवळपास ६०० लोकांचा मृत्यू व ४८०० लोक जखमी झाले होते. यात २१ शीख सैनिक शहिद झाले होते. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व परिणीती चोप्रा यांच्याव्यतिरिक्त भाग्यश्री व एडवर्डदेखील दिसणार आहे.