मल्टिस्टारर सिनेमे करण्यास का घाबरतात बॉलिवूड स्टार्स? अक्षय कुमारने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 08:00 AM2019-08-06T08:00:00+5:302019-08-06T08:00:10+5:30
बदलत्या काळासोबत मल्टिस्टारर चित्रपटांची क्रेज कमी झाली. बॉलिवूड स्टार्सही मल्टिस्टारर चित्रपट करण्यास अनुत्सुक दिसू लागले. आजघडीला अक्षय कुमारसारखे काही निवडक स्टार्स मल्टिस्टारर सिनेमे करण्यास तयार होतात.
70,80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांची चलती होती. पण बदलत्या काळासोबत मल्टिस्टारर चित्रपटांची क्रेज कमी झाली. बॉलिवूड स्टार्सही मल्टिस्टारर चित्रपट करण्यास अनुत्सुक दिसू लागले. आजघडीला अक्षय कुमारसारखे काही निवडक स्टार्स मल्टिस्टारर सिनेमे करण्यास तयार होतात.
सध्या अक्षय कुमार ‘मिशन मंगल’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शर्मन जोशी, किर्ती कुल्हारी असे अनेक स्टार्स आहेत. म्हणजेच हा चित्रपटही एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. याशिवाय ‘हाऊसफुल 4’ हा आणखी एक मल्टिस्टारर सिनेमा अक्षय करतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय मल्टिस्टारर चित्रपटांबद्दल बोलला.
मल्टिस्टारर सिनेमे करण्यात मला काहीही अडचण नाही. एखाद्या चित्रपटात माझी भूमिका लहान आहे की मोठी, याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासोबतच्या कलाकारांची भूमिका माझ्यापेक्षा मोठी असल्यानेही मला फरक पडत नाही. माझ्यासाठी फक्त चित्रपटाची कथा महत्त्वाची आहे. स्क्रिप्ट आवडली तर मी लगेच सिनेमा साईन करतो, असे अक्षयने यावेळी सांगितले.
अनेक कलाकार मल्टिस्टारर सिनेमे करण्यास का घाबरतात, याचे उत्तरही त्याने दिले. अनेक स्टार्स आजही स्वत:ला असुरक्षित मानतात. हेच कारण आहे की, मल्टिस्टारर सिनेमे त्यांना नको असतात. त्यांचा केवळ सोलो सिनेमे करण्यावर भर असतो.
अक्षयने आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून मल्टिस्टारर सिनेमे केले आहेत. 90 च्या दशकात अजय देवगण, सुनील शेट्टी, सैफ अली खान यांच्यासोबत त्याने अनेक चित्रपट केलेत. यापैकी बहुतांश चित्रपट हिट ठरलेत. कदाचित हेच अक्षयच्या यशाचे रहस्य असावे.