Video: ओह माय गदर! अक्षय कुमारने गायलं 'उड जा काले' गाणं; मानले प्रेक्षकांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 15:41 IST2023-08-17T15:38:31+5:302023-08-17T15:41:01+5:30
'ओह माय गदर' असं म्हणत त्याने दोन्ही सिनेमांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानलेत.

Video: ओह माय गदर! अक्षय कुमारने गायलं 'उड जा काले' गाणं; मानले प्रेक्षकांचे आभार
11 ऑगस्ट हा दिवस मनोरंजनसृष्टीसाठी खास होता. याच दिवशी सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओह माय गॉड 2' (OMG 2) दोन्ही सिनेमे रिलीज झाले. सनी आणि अक्की बॉक्सऑफिसवर आमने सामने आले. कोणाचा सिनेमा चालणार कोणाचा नाही अशा अनेक चर्चा सुरु झाल्या. मात्र दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळे अक्षय कुमारने प्रेक्षकांचे आभार मानलेत.
'ओह माय गॉड' सिनेमात एका सीनमध्ये अक्षय कुमार 'गदर' चं 'उड जा काले कावा' गाणं गाताना दिसतो. अक्षयने सिनेमातील हाच सीन पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने लिहिलेलं हॅशटॅग चर्चेत आहे. 'ओह माय गदर' असं म्हणत त्याने दोन्ही सिनेमांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानलेत. अक्षय लिहितो, 'ओह माय गदरला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. सिनेमाच्या इतिहासात सर्वोत्तम आठवडा दिल्याबद्दल प्रेक्षकांना मनापासून थँक्यू.'
'गदर 2'ने पाच सहा दिवसात २६० कोटींची कमाई केली आहे तर 'OMG 2' ने ८० कोटींचा व्यवसाय केला आहे. OMG 2 लवकरच १०० कोटी पार करेल अशी अपेक्षा आहे. अक्षयने दोन्ही सिनेमांचं कौतुक करत प्रेक्षकांचे आभार मानलेत. मात्र दुसरीकडे सनी देओलने अद्याप OMG 2 बघितला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ब्लॉकबस्टर सिनेमांमुळे प्रेक्षकांना मात्र ही पर्वणीच आहे.