Video: अरे बापरे! दबक्या पावलांनी येत अक्षय - टायगरने का लपवला स्वतःचा चेहरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:26 IST2024-03-09T15:23:54+5:302024-03-09T15:26:12+5:30
अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय

Video: अरे बापरे! दबक्या पावलांनी येत अक्षय - टायगरने का लपवला स्वतःचा चेहरा?
अक्षय कुमार - टायगर श्रॉफ हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अक्षय - टायगरची भूमिका असलेला 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. अक्षय - टायगर सध्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी भारतात विविध ठिकाणी फिरत आहेत. अशातच अक्षय - टायगरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत हे दोघे मीडियापासून चेहरा लपवताना दिसत आहेत.
झालं असं की.. विरल भयानी या पेजने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत अक्षय कुमार - टायगर श्रॉफ एका इमारतीच्या भिंतीचा आधार घेऊन कडेकडेने चालत येत आहेत. पण विशेष गोष्ट म्हणजे.. दोघांनी स्वतःचा चेहरा मात्र झाकला आहे. दोघांनी शर्टाचा आधार घेत स्वतःचा चेहरा लपवलेला दिसतोय. हा व्हिडीओ पाहून सतत फोटो काढण्यात व्यस्त असणाऱ्या पापाराझींसोबत खिलाडी कुमार आणि टायगरने प्रँक केला अशी चर्चा आहे.
व्हिडीओच्या शेवटी अक्षय - टायगर एकमेकांना हात मिळवताना दिसत आहेत. या दोघांचाही हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षय - टायगरची प्रमुख भूमिका असलेला 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. ईदच्या मुहुर्तावर एप्रिल महिन्यात रिलीज होतोय. या सिनेमात साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.