अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता या तारखेपासून OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 10:10 IST2024-05-30T10:10:08+5:302024-05-30T10:10:31+5:30
अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता तुम्हाला घरबसल्या बघता येणार आहे. (bade miyan chote miyan)

अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता या तारखेपासून OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या
अक्षय कुमार - टायगर श्रॉफ या जोडीचा 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप झाला. बिग बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली. 'बडे मिया छोटे मिया' समोर 'मैदान' सिनेमाचं तगडं आव्हान होतं. परंतु 'मैदान'चं जितकं कौतुक झालं तितकी चर्चा 'बडे मिया छोटे मिया' च्या वाट्याला आली नाही. आता 'बडे मिया छोटे मिया' OTT वर रिलीज व्हायला सज्ज आहे.
'बडे मिया छोटे मिया' OTT वर कधी होतोय रिलीज?
'बडे मिया छोटे मिया' सिनेमा आता थिएटर गाजवून ओटीटवर रिलीजसाठी सज्ज आहे. ६ जूनला नेटफ्लिक्सवर 'बडे मिया छोटे मिया' चा प्रिमियर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे. 'बडे मिया छोटे मिया' सिनेमात एकापेक्षा एक सुपरस्टार होते. अक्षय कुमार - टायगर श्रॉफ - पृथ्वीराज हे तगडे कलाकार असूनही सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता ओटीटवर हा सिनेमा गाजणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
'बडे मिया छोटे मिया' सिनेमाविषयी..
'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते आहेत. 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.