सनी देओलच्या मदतीसाठी धावून आला अक्षय कुमार, बंगला वाचवण्यासाठी अभिनेता करणार ४० कोटींची मदत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:30 PM2023-08-21T14:30:06+5:302023-08-21T14:42:03+5:30
'गदर २' स्टार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्यासाठी खिलाडी कुमार मदत करणार असल्याचं वृत्त आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल ‘गदर २’ चित्रपटाबरोबरच त्याच्या जुहू येथील बंगल्याच्या लिलावामुळे सध्या चर्चेत आहे. ५६ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक ऑफ बडोदाने सनी देओलला या बंगल्याच्या लिलावाची नोटीस पाठवली होती. २५ सप्टेंबरला ई-ऑक्शन पद्धतीने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचं बँकने नोटीशीत म्हटलं होतं. आता सनी देओललच्या मदतीला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार धावून आला आहे. अक्षय कुमार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव होण्यापासून रोखण्यासाठी त्याची मदत करणार असल्याचं वृत्त आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सनी देओलच्या बंगल्याच्या लिलावाबाबत समजताच अक्षयने त्याची भेट घेतली. खिलाडी कुमार रविवारी(२० ऑगस्ट) सनी पाजीला भेटायला गेला होता. मीडिया रिपोर्टनुसार अक्षय सनी देओलची बंगला वाचवण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे. यासाठी कर्जाचा मोठा हफ्ता अक्षय कुमार भरणार असल्याचंही वृत्त आहे. सनी देओलला अक्षय कुमार तब्बल ३० ते ४० कोटींची मदत करण्यासाठी तयार असल्याचा खुलासा जवळच्या व्यक्तीने केला आहे.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...
सोनाली बेंद्रेबरोबरच्या संवादानंतर केदार शिंदे भारावले, म्हणाले, “ज्या पद्धतीने त्यांनी…”
दरम्यान, सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची नोटीस बँक ऑफ बडोदाकडून मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे बंगल्याचा लिलाव होणार नसल्याची माहिती आहे. यामागे तांत्रिक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. सनी देओलच्या टीमने रविवारी लिलावाच्या नोटिसीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम योग्य नसल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले. तसेच सनी देओल एक-दोन दिवसांत संपूर्ण रक्कम देईल, असेही सांगण्यात आले आहे. जुहूमधील आलिशान ठिकाणी हा बंगला असून या बंगल्यामध्ये आणखी दोन निर्मात्यांची कार्यालये आहेत. सनीचे कार्यालय आहे. तसेच, एक आलिशान साउंड स्टुडिओ आणि छोटेखानी चित्रपट थिएटर आहे.