Video: अक्षय कुमारनं लॉन्च केला स्वत:चा फॅशन ब्रँड अन् पहिल्यांदाच सर्वांना आलिशान घरही दाखवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 16:28 IST2022-12-08T16:27:56+5:302022-12-08T16:28:10+5:30
Akshay Kumar : "माझ्या करिअरमध्ये असं पहिल्यांदाच होतंय की मी माझ्या घरातून मुलाखत देतोय", 'खिलाडी' कुमारचं घर आहे तरी कसं पाहा...

Video: अक्षय कुमारनं लॉन्च केला स्वत:चा फॅशन ब्रँड अन् पहिल्यांदाच सर्वांना आलिशान घरही दाखवलं...
Akshay Kumar : एकापाठोपाठ एक सिनेमे करणारा बॉलिवूडचा ‘बिझी कुमार’ आता आपला फॅशन ब्रॅन्ड लॉन्च करतोय. फोर्स 9 असं त्याच्या ब्रॅन्डचं नाव आहे. अक्षयने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, यानिमित्ताने पहिल्यांदा अक्षयने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. पहिल्यांदा अक्षयने त्याच्या घरी मुलाखत दिली. याचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
मी पहिल्यांदा घरी इंटरव्ह्यू देतोय...
मी पहिल्यांदा घरी इंटरव्ह्यू देतोय. आजपर्यंत मी घरी कधीच इंटरव्ह्यू दिलेला नाही, असं अक्षय या व्हिडीओत म्हणताना दिसतो. आपल्या फॅशन ब्रँडचं नाव फोर्स 9 का ठेवलं? याचं उत्तरही तो या व्हिडीओत देतो. ब्रह्मांडाला कंट्रोल करणारा सर्वात मोठा फोर्स असतो. दुसरा फोर्स आहे मदर नेचर. तिसरा आपला आर्म्ड फोर्स. माझे वडिल आर्मीत होते म्हणून मला त्याबद्दल अपार आदर आहे. माझा लकी नंबर 9 आहे. माझा वाढदिवसही 9 तारखेला असतो. या दोन्ही गोष्टी मिक्स करून मी फोर्स 9 हे नाव दिलं आहे, असं अक्षय सांगतो.
यानंतर अक्षय आपला वार्डरोब दाखवतो. माझ्या मनासारखे कपडे घालायचे तर मी रोज ट्रॅक पॅन्ट्स आणि हुडी घालेल. पातळ टी-शर्ट घालेल. मला असेच कम्फर्टेबल कपडे आवडतात आणि मला तसेच बनवायचे होते, असं तो सांगतो. या व्हिडीओत अक्षयच्या घराची झलक पाहायला मिळते.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या त्याच्याकडे अनेक सिनेमे आहेत. नुकतंच त्याने ‘वेडात मराठे वीड दौडले सात’ या मराठी सिनेमाचं शूटींग सुरू केलं. यात तो शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. याश्विाय सेल्फी, कॅप्सूल गिल, ओएमजी 2 असे अनेक सिनेमे त्याच्याकडे आहेत.