सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:35 PM2023-08-18T12:35:23+5:302023-08-18T12:36:13+5:30

अक्षय कुमारचं होतंय कौतुक.

akshay kumar took not a single rupee for omg 2 director says he took risk and we didi it | सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2'

सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2'

googlenewsNext

एकामागोमाग एक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' (OMG 2) रिलीज झाला. या सिनेमाकडून त्याला खूप अपेक्षा होत्या. सिनेमाला आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. सहाच दिवसात सिनेमाने ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अक्षय सिनेमात भगवान शंकराच्या भूमिकेत आहे. आश्चर्य म्हणजे अक्षयने सिनेमासाठी एकही पैसा घेतलेला नाही.

'ओह माय गॉड 2' चे निर्माते अजित अंधारे यांनी एका मुलाखतीत सांगितले, 'OMG 2 च्या बजेटला घेऊन चुकीची माहिती पसरत आहे. अक्षय कुमारने फिल्मसाठी एक रुपयाही घेतलेला नाही. उलट अशा रिस्की फिल्ममध्ये त्याने माझी साथ दिली. मी अनेक वर्षांपासून त्याला ओळखतो. OMG, स्पेशल 26, आणि टॉयलेट एक प्रेम कथा सारखे चित्रपट आम्ही केले आहेत.  अशा हटके स्क्रीप्टवर मी त्याच्याशी बोलतो. त्याच्याशिवाय ही रिस्क घेणं शक्यच नव्हतं. अक्षयने मला शक्य ती सगळी मदत केली.'

सिनेमाचे दिग्दर्शक अमित राय यांनीही अक्षय कुमारची स्तुती केली. अमित राय म्हणाले, 'रोड टू संगमनंतर मी १० वर्ष घरीच होतो. माझ्याकडे काम नव्हतं. खूप मोठ्या ब्रेकनंतर मी OMG 2 ची संधी मिळाली. पण आम्ही हा सिनेमा सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत. सेन्सॉर बोर्डाला हे माहित आहे का की अनेक निर्मात्यांनी ही स्क्रीप्ट नाकारली होती. करण जोहर, आशुतोष गोवारीकर आणि अनेकांनी सिनेमा नाकारला. शेवटी अक्षय कुमारने सिनेमा बनवण्याची हिंमत दाखवली. अक्षय स्क्रीप्टबाबत खूपच स्पष्ट होता. हा सिनेमा बनलाच पाहिजे असंही तो म्हणाला. त्याच्यामुळेच आम्ही हिंमत दाखवली नाहीतर OMG 2 कधीच बनू शकला नसता. अक्षयपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो तर सिनेमा बनला नसता.कदाचित स्क्रीप्टच्या कागदाचं माझ्या मुलांनी जहाज बनवलं असतं किंवा कोणी त्यावरच दाणे खात असतं. इतके पैसे खर्च करुन बोर्ड म्हणतं की आम्ही फिल्म दाखवू शकत नाही.'

OMG 2 सिनेमा १५०  कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. कमी बजेटच्या या फिल्मने समानाधनाकरक व्यवसाय केला आहे. आतापर्यंत सिनेमाने 85.05 कोटी कमावले आहेत. तर वर्ल्डवाईड कलेक्शन १२० कोटी रुपये झालं आहे.

Web Title: akshay kumar took not a single rupee for omg 2 director says he took risk and we didi it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.