Akshay Kumar : इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 12:35 PM2022-07-10T12:35:15+5:302022-07-10T12:41:16+5:30

Akshay Kumar first look from the film capsule gill: अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीये. ‘कॅप्सूल मॅन’ जसवंत सिंह गिल यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. याचा फर्स्ट लुक आला. पण यावेळी अक्षय चाहत्यांना फारसा इम्प्रेस करू शकला नाही...

Akshay Kumar troll for new film first look came out from the film capsule gill | Akshay Kumar : इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल

Akshay Kumar : इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल

googlenewsNext

Akshay Kumar Film Capsule Gill: अक्षय कुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी स्टार. वर्षभरात सर्वाधिक चित्रपट करणाऱ्यांच्या यादीत तो नेहमीच अव्वल असतो. कमीत कमी दिवसांत चित्रपटाचं शूटींग संपवून लगेच दुसऱ्यानव्या चित्रपटात बिझी व्हायचं, हा त्याचा कामाचा पटर्न. म्हणून एक संपला की, दुसरा अन् दुसरा संपला की तिसरा असे त्याचे सिनेमे रिलीज होत असतात. सध्या अक्षयचे अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत आणि आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीये. ‘कॅप्सूल मॅन’ जसवंत सिंह गिल यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. याचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला. पण यावेळी अक्षय चाहत्यांना फारसा इम्प्रेस करू शकला नाही.

ट्रोलर्सच्या निशाण्यावर...
ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी अक्षयच्या आगामी बायोपिकचा फर्स्ट लुक शेअर केला. या चित्रपटाचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. पण अक्षयचा आणखी एक नवा सिनेमा येतोय, हे ऐकल्याबरोबर अनेक युजर्सनी अक्षयला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘इतक्या लवकर तर मॅगी पण तयार होत नाही... तुला वर्षातून चारदा पाहून बोर झालो आहे. आम्हा सर्वांना ब्रेक तर दे, रिलॅक्स तर होऊन दे. तसंही सम्राट पृथ्वीराजमधून तुझा सिली परफॉर्मन्स पाहून मन खराब झालं आहे,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.

‘बस कर बस कर... कितना फेक लुक के साथ मुव्ही खतम करेगा ये,’अशी कमेंट एका युजरने केली. काही युजर्सनी मात्र अक्षय एक मेहनती कलाकार असल्याचं म्हणत, त्याच्या या नव्या लुकचं कौतुक केलं.

अक्षयच्या या नव्या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट जसवंत सिंह गिल यांच्या कथेवर आधारित आहे. 1989 साली जसवंत सिंह गिल यांनी  पश्चिम बंगालच्या महावीर कोळसा खाणीत 300 फूट खोल अडकलेल्या 65 लोकांचा जीव वाचवला होता. पूरामुळे खाणी पाणी भरलं होतं. यावेळी जसवंत सिंह गिल हे अ‍ॅडिशनल चीफ मायनिंग इंजिनिअर होते. मजुरांचा जीव वाचवण्यासठी त्यांनी स्टीलची कॅप्सूल बनवली होती. 1991 साली भारत सरकारने त्यांना जीवन रक्षक पदकाने सन्मानित केलं होतं.

Web Title: Akshay Kumar troll for new film first look came out from the film capsule gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.