शेतकरी आंदोलन चिघळत असताना तू जाहिराती कसल्या करतोस? अक्षय कुमार असा झाला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 01:07 PM2020-12-04T13:07:48+5:302020-12-04T13:09:04+5:30
अक्षय कुमारने एक जाहिरात शेअर केली आणि तो लोकांच्या निशाण्यावर आला.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अनेकदा राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तूर्तास अक्षय एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि देशभरातून या आंदोलनाला पाठींबा दिला जातोय. अशात अक्षय कुमारने एक जाहिरात शेअर केली आणि तो लोकांच्या निशाण्यावर आला.
अक्षयने त्याच्या सोशल अकाऊंटवर ‘पगार बुक’ची एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत अक्षय मासिक वेतन, अडेंटेन्स आणि अॅडव्हान्स पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा हे सांगतोय. ‘अब इंडिया का हर बिजनेसमॅन होगा डिजिटल’, असेही तो यात म्हणताना दिसतोय. अक्षयने ही जाहिरात शेअर केली आणि लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.
Akshey sir, galat gal aa tuhadi jo tusi farmer mudde te chup ho, tuhade to eh umeed ni c, tusi khud nu punjabi keha pr tusi jo chup baithe ho us nal apne #aandata nal dhokha kma rhe ho. Maneya industry ch rehn lyi bhut kz krna penda pr ki fyida sir jo ankh hi maar lyi. 😶 Dhanwad pic.twitter.com/CW5veY6g2U
— Gurpreet Bawa (@gurpreetbawa001) December 3, 2020
दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळले असताना अशा काळात या शेतक-यांबद्दल बोलण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतोस, अशा शब्दांत लोकांनी त्याला लक्ष्य केले.
‘शेतकरी आंदोलनावर गप्प का?’ असा थेट प्रश्न एका युजरने त्याला केला. अलीकडे अक्षयने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केलेत. इकडे शेतकरी मरताहेत आणि तुला पगार बुकची पडलीये, असे एका युजरने त्याला सुनावले. अर्थात अक्षयच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या ‘पगार बुक’ जाहिरातीचे कौतुकही केले.
इधर किसान मर रहे है और तुझे पगारबुक की पडी है ! चमन***
— Nitin Gedam (@NitinGedam11) December 3, 2020
itni chapploosi of MoDI Great @akshaykumar#supportfarners
— Gurlal maan (@gurlalmaan92) December 3, 2020
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच ‘बेलबॉटम’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यग्र आहे. ‘पृथ्वीराज’ चित्रपटानंतर अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल रायचा ‘अतरंगी रे’चे शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणा-या ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची यादी इथे संपत नाही, ‘बच्चन पांडे’नंतर तो एकता कपूर निर्मित एका अॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी जुलैच्या जवळपास सुरु होईल आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत सिनेमा बनून तयार होईल.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबत अक्षय कुमारला एक सोशल ड्रामा आणि एक्शन थ्रिलर चित्रपटाची देखील ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे जवळपास एकूण १० चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग २०२१ पर्यंत पूर्ण होईल.