OMG-2 च्या यशानंतर अक्षय कुमारच्या हाती लागला सर्वात महागडा चित्रपट, जाणून घ्या बजेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:57 PM2023-09-05T18:57:49+5:302023-09-05T18:58:16+5:30

Akshay Kumar Upcoming Film: यापूर्वी अक्षय कुमारने 500 कोटींच्या '2.0'मध्ये काम केले आहे.

Akshay Kumar Upcoming Film: Akshay Kumar's most expensive film after the success of OMG-2 | OMG-2 च्या यशानंतर अक्षय कुमारच्या हाती लागला सर्वात महागडा चित्रपट, जाणून घ्या बजेट...

OMG-2 च्या यशानंतर अक्षय कुमारच्या हाती लागला सर्वात महागडा चित्रपट, जाणून घ्या बजेट...

googlenewsNext

Akshay Kumar Upcoming Film: अभिनेता अक्षय कुमारचे 'OMG-2' चित्रपटातून दमदार कमबॅक झाले आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता अक्षय कुमारच्या हाती त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट लागला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण यूकेमध्ये होणार असल्याची माहिती आहे. अक्षयच्या कारकिर्दीतील हा महागडा चित्रपट 'हाऊसफुल 5' आहे.

'हाऊसफुल' फ्रँचायझीचे चार भाग रिलीज झाले आहेत आणि आता निर्माते साजिद नाडियादवाला पाचव्या भागावर काम करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसह मोठी स्टारकास्ट असणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. तर, तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो. 

किती आहे चित्रपटाचे बजेट ?

पिंकविलानुसार, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला 2024 मध्ये त्यांच्या चित्रपटांवर 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या 1000 कोटी रुपयांपैकी 'हाऊसफुल 5' चित्रपटासाठी 375 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. असे झाल्यास अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला या दोघांच्याही कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल. याआधी अक्षय कुमारने 500 कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या '2.0'मध्ये काम केले होते, मात्र हा चित्रपट रजनीकांत यांचा होता. नाडियादवाला इतर बजेट कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' आणि टायगर श्रॉफच्या 'बागी 4'सह इतर चित्रपटांमध्ये गुंतवणार आहे.

Web Title: Akshay Kumar Upcoming Film: Akshay Kumar's most expensive film after the success of OMG-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.