"अकबर-औरंगजेब यांच्याविषयी शालेय पुस्तकात धडे आहेत पण..."; अक्षय कुमारने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:36 IST2025-01-24T12:28:38+5:302025-01-24T12:36:41+5:30
अक्षय कुमारने स्काय फोर्स सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याच्या मनातली खंत व्यक्त केलीय (akshay kumar, sky force)

"अकबर-औरंगजेब यांच्याविषयी शालेय पुस्तकात धडे आहेत पण..."; अक्षय कुमारने व्यक्त केली खंत
अक्षय कुमारच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. आज हा सिनेमा जगभरात रिलीज झाला आहे. 'स्काय फोर्स' सिनेमा भारतीय वायुसेनेतील सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत वीर पहारिया झळकत आहे. अक्षय कुमार गेल्या काही वर्षांमध्ये बायोपिक करताना भारतीय मातीमधील अज्ञात हिरोंचे सिनेमे निवडतोय. 'पॅडमॅन', 'टॉयलेट एक प्रेम कथा' हे सिनेमे त्याचं उत्तम उदाहरण आहेत. अक्षयने एका मुलाखतीत त्याच्या मनातील खंत व्यक्त केली.
अक्षय कुमारने व्यक्त केली खंत म्हणाला...
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने सांगितलं की, "मी सिनेमांचे असे विषय निवडतो ज्या विषयांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे. मी जाणूनबुजुन अशा भूमिका साकारतो जे पुस्तकांचा हिस्सा नाहीत. त्यामुळे माझी अशा भूमिका साकारण्याची इच्छा होते. हे सर्व अज्ञात हिरो आहेत. यामुळे अशा हिरोंंबद्दल लोकांना काही माहित नसतं. किंवा कोणीही या व्यक्तीचा सखोल अभ्यास करत नाही. म्हणून मी अशाच भूमिका निवडतो."
"शालेय अभ्यासक्रमात अनेक गोष्टी सुधारण्याची गरज आहे. आपण अकबर किंवा औरंजजेब यांच्याविषयी वाचतो परंतु आपल्याच देशातील हिरोंविषयी आपण वाचत नाही. त्यामुळे अशा हिरोंची माहिती देणं आवश्यक आहे. भारतीय सेनेच्या अनेक कहाणी आहेत. अनेक शूरवीरांना परवमीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. त्यामुळे मला वाटतं की, इतिहास सुधारण्याची गरज आहे. अशा व्यक्तिमत्वांना लोकांसमोर आणण्याची गरज आहे जे आपण येणाऱ्या पिढीला सांगू शकतो."