अक्षय कुमारला रिझवण्याच्या प्रयत्नात होत्या रेखा; पण या अभिनेत्रीने केला गेम खल्लास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 21:00 IST2020-04-05T21:00:00+5:302020-04-05T21:00:00+5:30
एकेकाळी रेखा यांनी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला होता.

अक्षय कुमारला रिझवण्याच्या प्रयत्नात होत्या रेखा; पण या अभिनेत्रीने केला गेम खल्लास
बॉलिवूडमध्ये काही लिंकअप स्टोरी खूप लोकप्रिय झाल्या आहते. मग सलमान खान -ऐश्वर्या रायचं नातं असेल किंंवा रणबीर कपूरचे दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफसोबतचे अफेयरची चर्चा परंतु सर्वात जास्त चर्चेत अफेयर होतं ते अभिनेत्री रेखा यांचं. एकेकाळी रेखा यांनी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला होता.
अक्षय कुमारचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अक्षयचे लग्नाच्या आधी पूजा बत्रा, शिल्पा शेट्टी व रवीना टंडन यांच्यासोबत जोडले गेले होते. ही गोष्ट आहे त्यावेळची जेव्हा अक्षय व रवीना टंडन यांच्या अफेयरची चर्चा सगळीकडे रंगली होती.
सिनेमा खिलाडियों का खिलाडीमध्ये अक्षय कुमार व रवीना टंडन यांच्यासोबत अभिनेत्री रेखा देखील मुख्य भूमिकेत होत्या. सांगितलं जातं आहे की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा यांची नजर अक्षय कुमारवरून हटत नव्हती. त्या अक्षयसोबत प्रत्येकवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायच्या.
असं सांगितलं जातं की रेखा आणि अक्षय यांची जवळीक त्यावेळी रवीनाला खटकू लागली होती. एकदा रेखा आपल्या घरातून अक्षयसाठी जेवण बनवून घेऊन येत होत्या. त्यानंतर रवीनाने अक्षयला रेखा यांच्या पासून दूर राहण्यासाठी ताकीद दिली होती.
असंही बोलले जाते की एका मॅगझिनसाठी मुलाखत देताना रवीनाने ही गोष्ट मान्य केली होती की रेखा यांनी अक्षयला भुरळ पाडण्याचा केला होता प्रयत्न. फक्त सिनेमासाठी अक्षयने रेखाच्या वर्तुणूकीला सहन केले होते. मात्र या मुद्द्यावर रेखा यांनी नेहमी चुप्पी साधली आहे.