अक्षयच्या पत्नीची कौतुकास्पद कामगिरी! लंडन विद्यापीठाकडून ट्विंकलला केलं जाणार सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 17:06 IST2023-10-28T16:56:20+5:302023-10-28T17:06:50+5:30
ट्विंकल खन्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षयच्या पत्नीची कौतुकास्पद कामगिरी! लंडन विद्यापीठाकडून ट्विंकलला केलं जाणार सन्मानित
अभिनेत्री, लेखिका, इंटरेरियर डेकोरेटर अशी तिची ओळख तर आहेच. पण आता पुन्हा एकदा ट्विंकल खन्नाने तिची नवी ओळख निर्माण केली आहे. कारण तिने नुकतीच लंडन येथील विद्यापीठातून 'Creative and Life Writing' या विषयात मास्टर डिग्री घेतली आहे. नुकतच ट्विंकलने तिचा मित्र आणि चित्रपट निर्माता करण जोहरबद्दल असं काही वक्तव्य केलं की ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
ट्विंकल खन्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लंडन विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केल्याची आणि कवानाघ पुरस्कार मिळाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे. सुरुवातील मला याबद्दल सगळ्यांना सांगायला थोडा संकोच वाट होता. पण हा क्षण सांगतो की वय ही खरोखर फक्त एक संख्या आहे. ते तुमच्या ध्येयामध्ये कधीच अडथळ आणत नाही. मला माझ्या अंतिम प्रबंधासाठी पदवी मिळाली आहे. आता लंडन विद्यापीठाच्या गोल्डस्मिथ्सने पॅट कावनाघ पुरस्कारासाठी निवडले आहे. यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की, कदाचित माझ्या जुन्या मित्राने 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये चुकीच्या कलाकारांना कास्ट केले असावं.
या पोस्टमध्ये तिने एक पत्रही शेअर केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की तिचा पोर्टफोलिओ पॅट कवानाघ पुरस्कारासाठी निवडला गेला आहे, जो गोल्डस्मिथ्सच्या एमए इन क्रिएटिव्ह आणि लाइफ रायटिंग प्रोग्राममधील सर्वोत्कृष्ट कामासाठी दरवर्षी दिला जातो.