अक्षय कुमारने अशाप्रकारे दिल्या आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:04 PM2018-09-15T16:04:18+5:302018-09-15T20:00:00+5:30
अक्षयने आरवचा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण म्हणजे आरवचा वाढदिवस असून या पोस्टद्वारे अक्षयने त्याच्या लाडक्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना नेहमीच वेळ देतो. अक्षय हा बॉलिवूडमधील इतर अभिनेत्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. बॉलिवूड पार्टींमध्ये अथवा पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावण्यापेक्षा तो त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो. त्याला आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. तो त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत नेहमीच फिरायला जातो. तो त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर देखील पोस्ट करत असतो. अक्षयने इन्स्टाग्रामवर नुकताच त्याच्या मुलासोबतचा एक फोटो पोस्ट केला असून त्या सोबत एक खूपच छान संदेश लिहिला आहे. अक्षयने आरवचा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण म्हणजे आरवचा वाढदिवस असून या पोस्टद्वारे अक्षयने त्याच्या लाडक्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारने आरवसोबतचा एक छानसा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, तू माझ्यापेक्षा उंच झाला असून तू माझ्यापेक्षा स्मार्ट देखील आहेस. तसेच तू माझ्यापेक्षा कित्येक पटीने चांगला आहेस. तुला केवळ याच वर्षी नव्हे तर आयुष्यभर तुला हव्या असणाऱ्या सगळ्याच गोष्टी मिळो... आरव वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...
अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अक्षयची ही पोस्ट शेअर केली असून तिनेसु्द्धा या पोस्टसोबत मुलासाठी संदेश लिहिला आहे. तिने म्हटले आहे की, पंधरा वर्षांपासून तू आमच्या आयुष्याचा एक भाग बनला. तुझ्या वाढदिवसाला आम्हाला तुझी खूपच आठवण येत आहे.
अक्षय कुमारच्या ‘2.0’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला. पण हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हा टीजर आवडला तर काहींनी तो अपेक्षे इतका चांगला नसल्याची प्रतिक्रिया दिली. विशेषत: अक्षय कुमारच्या चाहत्यांनी हा टीजर पाहून सर्वाधिक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. संपूर्ण टीजरमध्ये अक्षय कुमारचा चेहरा फक्त एकदाच आणि तोही अगदी काही सेकंद दिसतो. यामुळे अक्षयच्या चाहत्यांमध्ये अनेक तक्रारीचे सूर उमटले होते. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.