​अक्षय कुमार जोरात; चित्रपटांची लागलीय रांग...मिळतेय मागेल ती किंमत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2017 05:12 AM2017-04-02T05:12:48+5:302017-04-02T10:42:48+5:30

अक्षय कुमार सध्या जोरात आहे. त्याच्याकडे चित्रपटांची अक्षरश: रांग लागलीय. बॉलिवूडमध्ये कदाचितच असा कुठला अभिनेता असेल, जो वर्षभरात तीन ...

Akshay Kumar Zorat; The price of the movie will be the price ... | ​अक्षय कुमार जोरात; चित्रपटांची लागलीय रांग...मिळतेय मागेल ती किंमत!!

​अक्षय कुमार जोरात; चित्रपटांची लागलीय रांग...मिळतेय मागेल ती किंमत!!

googlenewsNext
्षय कुमार सध्या जोरात आहे. त्याच्याकडे चित्रपटांची अक्षरश: रांग लागलीय. बॉलिवूडमध्ये कदाचितच असा कुठला अभिनेता असेल, जो वर्षभरात तीन ते चार चित्रपट करत असेल. शिवाय कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवून देत असेल. एका वर्षांत सर्वाधिक शंभर कोटींच्या क्लबमधील चित्रपट करण्याचा रेकॉर्ड अक्षय कुमारच्या नावावर आहे. कदाचित हेच कारण आहे की, अक्षय तोंडातून जितका आकडा निघेल, तितके मानधन त्याला मिळते. निर्माता आणि दिग्दर्शक अक्षयला वाट्टेल ती किंमत देण्यासाठी तयार होतात. मध्यंतरी एक बातमी आली होती. ही बातमी होती, गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी अक्षयने दिव्या खोसला कुमारचा एक दुसरा सिनेमा रिजेक्ट केल्याची. पण असे नाहीय. अक्षय हे दोन्ही चित्रपट करतोय आणि यासाठी अक्षयने तगडी रक्कम घेतल्याचे कळतेय. मीडियाचे मानाल तर दिव्या खोसला कुमारच्या चित्रपटासाठी अक्षयले तब्बल ५० कोटी रुपए इतकी फिस घेतली आहे. तर गुलशन कुमार यांचे बायोपिक ‘मोगल’साठी अक्षरने २७ कोटी आणि नफ्यात काही टक्क्यांचा वाटा घेतला आहे.

ALSO READ : खिलाडी अक्षयकुमारला ‘बॉक्सिंग’मध्ये चक्क डॉगींनी दिली टसन!!

सर्वाधिक बायोपिक करण्याचा आणखी एक नवा रेकॉर्ड अक्षयच्या नावावर आहे. होय, आर. बल्की यांचा ‘पॅडमॅन’, रिमा कागती यांचा ‘गोल्ड’ आणि गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोगल’ हे बायोपिक अक्षय करतो आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे.‘मोगल’ हा  चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या चित्रपटाची निर्मितीदेखील गुलशन कुमार यांचीच कंपनी टी-सीरिज करणार आहे. अक्षय या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या व्यक्तिरेखेत  पाहायला मिळणार आहे.  ‘गोल्ड’ हा चित्रपट भारतीय हॉकी खेळाडू बलबीर सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वातील हॉकी संघाने १९४८, १९५२ व १९५६ साली झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत स्वर्णपदक मिळविले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Akshay Kumar Zorat; The price of the movie will be the price ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.