लग्नानंतर अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडला केला रामराम, ३५ व्या वर्षी नवऱ्याचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 20:00 IST2019-12-15T20:00:00+5:302019-12-15T20:00:00+5:30
अक्षय कुमारच्या पहिल्या चित्रपटातील ही अभिनेत्री बॉलिवूडमधून आहे गायब, आता दिसते अशी

लग्नानंतर अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडला केला रामराम, ३५ व्या वर्षी नवऱ्याचं झालं निधन
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयचा १९९१ साली प्रदर्शित झालेला सौगंध चित्रपट लक्षात आहे ना... या चित्रपटात अक्षयने एका गरीब मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. मात्र अक्षय कुमारला ओळख मिळाली. या चित्रपटात अक्षयसोबत शांतीप्रिया नामक अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
सौगंधमधील अक्षय व शांतीप्रिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटात अक्षय व शांतीप्रियाचा बोल्ड किस सीनदेखील त्यावेळी खूप चर्चेत आला होता. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही अक्षयला खिलाडी सीरिजने फेमस केलं आणि स्टार बनविलं. मात्र शांतीप्रिया स्ट्रगल करत राहिली.
शांतीप्रिया बॉलिवूडमध्ये कमाल दाखवू शकली नाही तर तिने सिद्धार्थ रेसोबत १९९९ साली लग्न केलं आणि बॉलिवूडला अलविदा केले. मात्र तिच्या नशीबात काही वेगळंच होतं. २००४ साली तिच्या नवऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नवऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर आली.
शांतीप्रियाला दोन मुलांनादेखील सांभाळायचे होते आणि हा विचार करत तिने २००८ साली कमबॅक केलं. माता की चौकी आणि द्वारकाधीश या सारख्या मालिकेत तिने काम केलं आहे. शेवटची ती २०११ साली चित्रपटात झळकली. त्यानंतर ती पुन्हा गायब झाली.